कर्जत तालुक्यातील जलस्रोतांचे संवर्धन करा- महेंद्र थोरवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:06 AM2020-10-10T00:06:21+5:302020-10-10T00:06:25+5:30

जलसंधारणमंत्र्यांकडे पाझर तलाव, केटी बंधाऱ्यांची मागणी

Conserve water resources in Karjat taluka - Mahendra Thorve | कर्जत तालुक्यातील जलस्रोतांचे संवर्धन करा- महेंद्र थोरवे

कर्जत तालुक्यातील जलस्रोतांचे संवर्धन करा- महेंद्र थोरवे

googlenewsNext

कर्जत : तालुक्यातील उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या नद्यांमध्ये कोल्हापूर टाइपचे बंधारे आणि पाझर तलावांची किमान ३० वर्षे नवीन बांधणी झालेली नाही, तसेच असलेले जुने बंधारे, तसेच सहापैकी चार पाझर तलावांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पाण्याचे स्रोतांचे जतन करून, संवर्धन करण्याच्या मागणीसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकर गडाख यांची भेट घेऊन मागणी केली.

रायगड जिल्ह्यातील जलसंधारण विभागासंदर्भात राज्याचे जलसंधारणमंत्री शंकर गडाख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमधील जलसंधारण संदर्भात चर्चा केली. कर्जत तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. येथील शेतकरी शेतीशिवाय कोणताही व्यवसाय नाही. औद्योगिक वसाहतींना परवानगी नसल्याने स्थानिक शेतकरी भाजीपाला, दुग्धव्यवसाय, मासे व्यवसाय, फळ लागवड आदी जोडधंदे करीत असतात. यासाठी शेतकऱ्यांना लागणाºया पाण्याची आवश्यकता असते. मात्र, कर्जत तालुक्यातील उल्हासनदी ही बारमाही वाहणारी नदी आहे. मात्र, तालुक्यातील चिल्हार आणि पोसरी या नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात.

त्यात कर्जत तालुक्यात १९८० नंतर एकही नवीन पाझर तलाव बांधण्यात आलेल्या नाही, याची माहिती मंत्र गडाख यांना दिली. त्यात १९८०च्या दशकात बांधण्यात आलेले सर्व सहा पाझर तलाव यांच्यापैकी डोंगर पाडा आणि सोलन पाडा या दोनच पाझर तलाव यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य पाझर तलाव हे कधीही फुटू शकतात, अशी भीती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत असतात.

खांडपे, साळोख, कशेळे, खांडस या पाझर तलावांची शासनाने तात्काळ दुरुस्ती करावी आणि त्यातील पाणीसाठा यांचा योग्य वापर करावा, अशी सूचना केली, तसेच पाझर तलाव यांच्या दुरुस्तीबरोबर नांदगाव, गुडवण, ओलमन आदी ठिकाणी नवीन पाझर तलावांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्यापुढे ठेवला आहे.

कर्जत तालुक्यात जलसंधारण विभाग आणि पाटबंधारे विभागाने बांधलेले कोल्हापूर टाइपचे बंधारे यांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे उल्हास नदीमधील कोंडीवडेपासून चांदईपर्यंतच्या भागात असलेल्या कोल्हापूर टाइपच्या बंधाºयात पाणी साठत नाही.

तिच अवस्था चिल्हार नदीमधील कोल्हापूर टाइपच्या बंधाºयाची झाली असून, शासनाने कर्जत आणि खालापूर तालुक्यातील जुन्या बंधाºयांची दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी आमदार थोरवे यांनी राज्याचे जलसंधारणमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यावेळी रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते.

Web Title: Conserve water resources in Karjat taluka - Mahendra Thorve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.