शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मालवाहक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:36 AM

कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून मालवाहक हमाल सामान घेऊन जात असताना फलाट क्रमांक तीनवर धोकादायक पद्धतीने झुकलेल्या पत्र्यांमुळे गंभीर जखमी झाला;

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून मालवाहक हमाल सामान घेऊन जात असताना फलाट क्रमांक तीनवर धोकादायक पद्धतीने झुकलेल्या पत्र्यांमुळे गंभीर जखमी झाला; त्याच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली असून हाताचे बोट तुटतातुटता वाचले; मात्र बोटातील नसा तुटल्या आहेत.मागील काही महिन्यांपूर्वीपासून कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील इमारतीचे पत्रे धोकादायक पद्धतीने बसविले आहेत. हे पत्रे फलाटावर आल्याचे निदर्शनास आणून देत आहे. तरीदेखील आजतागायत फलाट क्रमांक तीनवरील धोकादायक ठरत असलेल्या पत्र्यांकडे कर्जत रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज मालवाहक हमाल गंभीर जखमी झाला आहे. फलाट क्रमांक तीनवरील इमारतीचे पत्रे फलाटावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी घातक ठरू शकतात, हे अनेकदा कर्जत रेल्वे प्रशासनास निदर्शनास आणून दिलेले होते. तरीदेखील कर्जत रेल्वे प्रशासनाकडून समस्या सोडविण्याबाबत काहीही हालचाल करण्यात आली नाही. जर मालवाहक हमालाऐवजी एखादी महिला आपल्या बाळास कडेवर घेऊन जात असताना अशा प्रकारची घटना घडली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.फलाट क्रमांक तीनवरील इमारतीचे पत्रे प्रवाशांच्या मान व खांद्यापर्यंतच्या अंतरावर धोकादायक पद्धतीने झुकलेले आहेत. त्यामुळे फलाटावरून जाणाºया प्रवाशांच्या मानेला, हाताला, डोक्याला गंभीर जखम होऊ शकते. धारधार पत्र्यामुळे एखाद्या प्रवाशाची मान कापून त्याचा मृत्यूही होऊ शकतो. तरी, भविष्यात फार मोठी दुर्घटना घडण्याअगोदर कर्जत रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक तीनवरील इमारतींची उंची वाढवून प्रवाशांना धोकादायक ठरणारे इमारतीचे पत्रे योग्य त्या मापात फलाटापासून वरच्या दिशेला न्यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होतआहे.