जलाशयाच्या तीरावर रिसॉर्टचे बांधकाम; अवसरे येथील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:47 AM2019-06-21T00:47:59+5:302019-06-21T00:48:02+5:30

पाटबंधारे विभागाची न्यायालयात धाव

Construction of resort at the reservoir pool; Aggressive farmer at Avasare | जलाशयाच्या तीरावर रिसॉर्टचे बांधकाम; अवसरे येथील शेतकरी आक्रमक

जलाशयाच्या तीरावर रिसॉर्टचे बांधकाम; अवसरे येथील शेतकरी आक्रमक

Next

नेरळ : कर्जत तालुक्यातील अवसरे येथे राज्याच्या पाटबंधारे विभागाचा, शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून लघु-पाटबंधारे प्रकल्प आहे. त्या धरणाच्या डाव्या बाजूला धरणाच्या जलाशयाला लागून रिसॉर्टचे बांधकाम सुरू केले आहे. गृहप्रकल्प राबविणाऱ्या कंपनीने त्या ठिकाणी रिसॉटर््सचे बांधकाम सुरू केले असून, यापूर्वीच पाटबंधारे खात्याने या कंपनीविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. तरीदेखील कंपनी आपले काम थांबवत नाही असे दिसून येत असून शेतकरी संतप्त झाले आहेत.

पाटबंधारे विभागाने अवसरे, बिरदोले आणि वरई गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून अवसरे हे लघु-पाटबंधारे प्रकल्पाचे धरण साकारले. त्या भागातील सात गावांतील ३०० हेक्टर जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या अवसरे लघु-पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणाची अनेक वर्षे दुरुस्ती केली नसल्याने शेतीला पाणी कमी पडते. त्यामुळे अवसरे भागातील शेतकरी वगळता कोदिवले, बिरडोळे, वरई, मानवली, निकोप आणि मोहाली भागातील शेतकरी भातशेती उन्हाळ्यात करीत नाहीत. दरवर्षी शेतकरी धरणाची दुरुस्ती करण्याची मागणी करीत असतात; पण पाटबंधारे विभागाला शेतकºयांच्या मागणीकडे बघायला वेळ नाही. गेल्या चार-पाच वर्षांत किरकोळ प्रमाणात शेतकरी उन्हाळी भातशेती करीत आहेत. तर शेतकºयांच्या ३० हेक्टर जमिनीवर अवसरे धरण बांधण्यात आले असून, या धरणाच्या जलाशयात पाण्याखाली गेलेल्या जमिनीचे केवळ भू भाडे असून काही शेतकºयांच्या जमिनी या सांडवा, मातीचा बांध आणि कालवे यांच्यासाठी वापरल्या आहेत. त्या जमिनी आता शेतकरी आपल्याला वापरायला मिळाव्यात म्हणून मागणी करीत आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागावर या भागातील शेतकरी नाराज आहेत.

असे असताना मात्र दुसरीकडे धरणाच्या जलाशयाला लागून रिसॉर्ट्सचे बांधकाम एक्सर्बिया या कंपनीकडून सुरू आहे. त्यामुळे शेतकºयांच्या नाराजीत भर पडली असून, आमच्या शेतीसाठी पाणी दिले जात नाही म्हणून आम्ही जमिनी अन्य कामासाठी वापरायला मागत असताना पाटबंधारे विभाग त्या जमिनी देत नाही. त्या जमिनी तशाच पडून असताना त्या जमिनीवर पाटबंधारे विभाग आपला अधिकार बजावत असताना दुसरीकडे आपल्या धरणाच्या जलाशयाला लागून असलेल्या जमिनीत रिसॉटर््स उभे राहत असताना पाटबंधारे विभाग मूग गिळून गप्प का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. रिसॉर्टच्या भिंती या जलाशयात बांधल्या असून उन्हाळाच्या चार महिने वगळता त्या रिसॉर्टच्या पायºयांना धरणाचे पाणी लागणार आहे.

मात्र, त्याच रिसॉर्टच्या पलीकडे बिरोडोळे येथील शेतकºयांच्या जमिनी आहेत; पण त्या शेतकºयांना त्या जमिनीत जायला साधी परवानगी पाटबंधारे विभाग देत नाही. त्यामुळे एवढे मोठे बांधकाम आणि तेदेखील धरणाच्या जलाशयाला लागून कसे होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आमची कंपनी कधीही अन्य कोणाच्या जागेत बांधकाम करत नाही, त्यामुळे धरणाच्या जवळ बांधकाम झाले असले तरी ती जमीन आमच्या कंपनीच्या नावे आहे. पाटबंधारे खात्याने आम्हाला बांधकाम करायला परवानगी दिली आहे.
- दीपक जाधव, अधिकारी, एक्सर्बिया कंपनी

अवसरे लघु-पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयाला लागून बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र, ही कंपनी यापूर्वीच शासनाच्या जागेत घुसली असून आम्ही या कंपनी विरुद्ध न्यायालयात गेलो आहोत, न्यायालयाचा निकाल आल्यावर त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
- भरत काटले, उप अभियंता, पाटबंधारे विभाग

आमची जमीन सांडव्याच्या पलीकडे असलेल्या भागात आहे; पण तिकडे आम्हाला जाऊ देत नाहीत. मात्र, आमच्या जमिनीत जाण्याच्या रस्त्यावर रिसॉर्टचे बांधकाम सुरू होते, हा काय प्रकार आहे. आम्ही मागील वर्षी जमीन कोणत्याही कमाविना पडून असल्याने वापरण्यासाठी द्यावी, अशी मागणी केली; पण पाटबंधारे खाते आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही.
- भगवान जामघरे, शेतकरी

Web Title: Construction of resort at the reservoir pool; Aggressive farmer at Avasare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.