पाली : वीज महावितरणच्या मनमानी कारभाराचा त्रास सुधागड तालुक्यासह पालीतील वीज ग्राहकांना होत आहे. बहुतांश वीज ग्राहकांना वीज देयक हे नेहमी अंतिम देयक दिनांकानंतर येत आहेत. परिणामी, वेळेत बिल घरी न आल्याने ग्राहकांना वारंवार हकनाक अतिरिक्त दंड भरावा लागत आहे. वीज वितरण कार्यालयाकडून त्यांच्या तक्रारीची दखलही घेतली जात नाही. यामुळे वीज ग्राहक त्रस्त आहेत.वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणाºया वीज देयकावर देयक दिनांक टाकण्यात येतो. हा देयक दिनांक म्हणजे ज्या वेळी वीज बिल सिस्टीममध्ये तयार होते ती तारीख असते. साधारण या तारखेच्या दहा दिवसांमध्ये ग्राहकांच्या घरी वीज बिल येणे अपेक्षित असते. अंतिम देयक दिनांकापासून बिल भरण्याची अंतिम तारीख घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांसाठी वेगवेगळी असते; परंतु तोपर्यंतही अनेक ग्राहकांकडे वीज बिल पोहोचत नसल्याने ग्राहकांना हकनाक दंडाची रक्कम भरावी लागते. दंडाची रक्कम वीज देयकाच्या रकमेवरून ठरते. दहा रुपयांपासून पुढे कित्येक रु पये दंड आकारला जातो. परिणामी, वीज बिल वितरक ठेकेदाराने घरी वीज बिल उशिरा आणल्याने कोणतीही चूक नसताना वीजग्राहकास दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.महावितरण कंपनीने वीज देयक वितरित करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक केली आहे. सध्या वीज महावितरणचे कर्मचारीदेखील बिलांचे वाटप करत आहेत. अनेक वेळा या ठेकेदारांच्या हातात उशिरा बिले पडतात, तर काही वेळा देयके वाटण्यास उशीर झाल्याने ग्राहकांकडे वीज देयक उशिरा पोहोचते. तर काही वेळेला क्षेत्र मोठे असल्याने वीज देयक वेळेत पोहोचत नाहीत. बहुतांश ठिकाणी ठेकेदार उपलब्ध होत नसल्याने आहेत त्यांनाच चालवून घ्यावे लागते. तर काही ग्राहकांची अशी तक्रार आहे की मुद्दामहून त्यांना उशिरा बिल दिले जाते.असे प्रकार वारंवार होत असल्याने ग्राहकांमध्ये वीज वितरण कंपनीबाबत प्रचंड राग व असंतोष निर्माण झाला असून, तालुक्यातील वीज ग्राहक महावितरणविरोधात लवकरच आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.ग्राहकांच्या सोयीसाठी आता आमच्या कर्मचाºयांमार्फत वीज देयक वाटत आहोत. केंद्रीय पद्धतीने वीज बिलिंग सुरू झाले आहे. प्रत्येकाचे अंतिम दिनांक वेगवेगळे येतात. बिलाची पीडीएफ उशिरा आली तर बिल द्यायला उशीर होतो. वीज देयक काही ठरावीक ग्राहकांनाच वारंवार उशिरा जात असतील तर त्याची दखल घेतली जाईल, अशी तक्र ार पुन्हा न येण्यासंदर्भात वीजवाटप करणाºयांनाही सांगण्यात आले आहे.- गोविंद बोईने, उपकार्यकारी अभियंता, वीज महावितरण कार्यालय, पालीवारंवार वीज देयकाच्या अंतिम दिनांकानंतर देयक घरी येते, त्यामुळे विनाकारण अतिरिक्त दंड भरावा लागतो. मागील सहा महिन्यांपासून पाली वीज वितरण कार्यालयाकडे लेखी पत्रव्यवहार करून या संदर्भात तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र, तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही, तसेच वेळी-अवेळी म्हणजे पहाटे ५.३०च्या दरम्यानही घरात वीज देयक दिले जाते, त्यामुळे खूप मनस्ताप होतो. यावर वेळीच उपाययोजना होऊन अतिरिक्त दंडाची रक्कम परत करण्यात यावी.- भगवान शिंदे,वीज ग्राहक, नाडसूर
उशिरा येणाऱ्या वीज बिलांमुळे ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:40 PM