- आविष्कार देसाई रायगड : ‘काेराेनापासून वाचायचे असेल तर, ताेंडाला मास्क लावणे आणि सॅनिटीयझरचा वापर करणे बंधनकारक आहे. सुरुवातीला चढ्या दराने मिळणाऱ्या मास्कमुळे सर्वसामान्याना खरेदी करणे परडत नव्हते. आता सरकारच्या निर्णयाची माहिती नागरिकांनाही असल्याने मेडीकल दुकानदार चढ्या दराने मास्कची विक्री करण्यास धजावत नाहीत मात्र अन्य दुकानामधून फॅन्सी मास्क विकत घेण्याचा ग्राहकांचा कल वाढल्याचे लाेकमतने केलेल्या रिअॅलिटी चेकमधून दिसून आले. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क वापरण्याची सवय लागली आहे.
बाजारामध्ये विविध फॅन्सी मास्कअलिबाग शहरातील मेडिकल दुकानामध्ये सरकारी निमयमांचे पालन केले जाते. सुरुवातीला अव्वाच्या सव्वा किमतली विकले जाणारे मास्क आता नियमानुसार मिळत आहेत. काेराेना कधी जाणार याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे बाजारामध्ये विविध फॅन्सी मास्क विक्रीसाठी आले आहेत. ते खरेदी करण्याचा कल असल्याचे दिसून आले.
मास्कचा नियमित वापरश्रीवर्धन तालुक्यात मास्कबाबत नागरिकांमध्ये चांगलीच जनजागृती झाली आहे. त्यामुळे नागरिक काेराेनापासून वाचवण्यासाठी मास्कचा वापर करताना दिसत आहे. या ठिकाणीही सरकारी नियमानुसारच मास्कची विक्री करण्यात येत आहे. जागरुक नागरिक संबंधीतांना सरकारी नियमांची आठवणही करुन देत आहेत.
मास्क अन् कमालीची जागरूकता कर्जतमध्येही मास्कबाबत कमालीची जागरुकता आली आहे. मेडीकल दुकांनामधून मास्क खरेदी करताना नागरिकांना सरकारी किमतीची माहिती असल्याने ते थेट किमत सांगुन अमूक मास्क पाहीजे असे सांगत आहेत. त्या ठिकाणीही रंगबीरंगी, फॅन्सी मास्क वापरण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसले.
नियम मोडल्यास कारवाईमास्कच्या सरकारी किंमतीबाबत सर्व मेडीकल दुकानदारांना माहिती दिली आहे. भरारी पथकामार्फत आम्ही त्यावर लक्ष ठेवत आहाेत मात्र अद्यापही आक्षेपार्ह्य काहीच आढळले नाही. जर नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्या विराेधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - गिरीश हुकरे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, रायगड