विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध
By admin | Published: January 9, 2017 06:32 AM2017-01-09T06:32:42+5:302017-01-09T06:32:42+5:30
उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी ताकद दाखविल्यामुळे, विषय समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीने फारसे ताणून
खोपोली : उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी ताकद दाखविल्यामुळे, विषय समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीने फारसे ताणून न धरण्याची भूमिका घेतले. यामुळे विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. राष्ट्रवादीच्या लीला ढुमणे यांच्याक डे बांधकाम तर भाजपाच्या अपर्णा मोरे यांच्याकडे आरोग्य खात्याचे सभापतिपद आले. विषय समित्यांच्या निवडणुकीत, शिवसेनेच्या वाट्याला तीन, एक स्थायी समितीपद आले, राष्ट्रवादीकडे दोन, शेकाप व भाजपाकडे प्रत्येकी एक सभापतिपद आले आहे. लीला ढुमणे (राष्ट्रवादी) बांधकाम समिती सभापती, सुनीता गायकवाड (राष्ट्रवादी) परिवहन, अपर्णा मोरे (भाजपा) आरोग्य, अर्चना पाटील (शिवसेना) नियोजन, वनीता काळे (शिवसेना) महिला व बालकल्याण, अलका शेंडे (राष्ट्रवादी) महिला व बालकल्याण उपसभापती, दिलीप जाधव (शेकाप) शिक्षण सभापती उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्याकडे पाणीपुरवठा खाते राहाणार आहे. स्थायी समितीवर बेबी सॅम्युअल (काँग्रेस), किसन शेलार (शिवसेना) व किशोर पानसरे (अपक्ष) यांची निवड झाली. संख्याबळाच्या विचार करता स्थायी समितीमध्ये शिवसेना, भाजपा, काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे.