शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

निवडणुकीची जय्यत तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 4:20 AM

प्रथमच व्हीव्हीपॅट मशिनचा वापर : जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांची माहिती

अलिबाग : लोकसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी सुरू केली आहे. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत हाती घेतला आहे. २०१९ साली होणाऱ्या रायगड लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट मशिनच्या वापर करण्यात येणार आहे. तीन हजार ३२६ व्हीव्हीपॅट मशिन लवकरच प्राप्त होणार आहेत. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये दोन हजार ६९३ मतदान केंद्रे राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रायगड जिल्ह्यात तब्बल १२ हजार ५०० नवीन मतदारांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे २१ लाख ६६ हजार ८७२ एवढी मतदारांची संख्या राहणार आहे, परंतु ३१ आॅक्टोबरनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल, असेही माने यांनी स्पष्ट केले.  मतदारांच्या जागृतीसाठी जिल्हास्तरावरून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महिला मतदारांचे प्रमाण वाढवणे, दिव्यांग मतदारांना विविध सोयी-सुविधा पुरवण्यासाठी स्वीप कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. युवा मतदारांवरही निवडणूक विभागाने विशेष लक्ष केंद्रित करताना हायस्कूल आणि महाविद्यालयीन स्तरावर निवडणूक साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा स्थापन करण्यात येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मयत, स्थलांतरित, दुबार मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. १०० मतदान केंद्रांची पडताळणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये दोन हजार ६९३ मतदान केंद्रे अस्तित्वात आली आहेत.आॅनलाइन पद्धतीने मतदार नोंदणीच्रंगीत छायाचित्र स्वीकारून त्यांचे अद्यावतीकरणाचे काम सुरू आहे. नवीन मतदार नोंदणी झालेल्या ९४ हजार २१ मतदारांना निवडणूक ओळखपत्र देण्यात आले आहे. आॅनलाइन पध्दतीने मतदार नोंदणी करण्याची सोय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात २१ लाख ५४ हजार ३७२ मतदारच्रायगड लोकसभा क्षेत्रामध्ये प्रथमच मतदानाकरिता व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात येणार आहे. एम-३ बनावटीच्या तीन हजार ३२६ ईव्हीएम मशिन उपलब्ध झाल्या आहेत. तेवढ्याच व्हीव्हीपॅट मशिन २० सप्टेंबरपर्यंत मिळणार आहेत. १० जानेवारी २०१८ रोजी अंतिमरीत्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार रायगड जिल्ह्यामध्ये एकूण २१ लाख ५४ हजार ३७२ मतदार आहेत. सदर मतदारांपैकी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट छायाचित्र असलेल्या मतदारांची संख्या दोन लाख ३७ हजार ११९ आहे, तर मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या एक लाख २३ हजार ५२२ आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये तब्बल १२ हजार ५०० मतदारांची वाढ होण्याची शक्यता असली तरी, ३१ आॅक्टोबरनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असल्याचे माने यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूकzpजिल्हा परिषद