नितीन भावेखोपोली : खालापूर ते खंडाळा घाट पायथ्यापर्यंत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४च्या रु ंदीकरणास मंजुरी मिळाली असून, त्यासाठी ३०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी पैकी २७५ कोटी निधी मिळवून देऊन, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) महामार्ग रुंदीकरणाचे काम मागील चार महिने सुरू आहे. मात्र, खोपोली हद्दीत काम करताना संबंधित ठेकेदाराकडून मंजूर वर्कआॅर्डरप्रमाणे कामे न करता, जाणीवपूर्वक रस्त्याची रुंदी कमी केली जात आहे.माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी ही बाब लक्षात आणून दिली. त्यावर आमदार लाड यांनी आक्र मक भूमिका घेत, वरिष्ठ पातळीवर तक्र ार करणार असल्याचे सांगून, कामात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महामार्ग रुंदीकरणासाठी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे, राज्यमंत्री रवि पाटील यांच्या सहकार्याने स्थानिक आमदार सुरेश लाड, नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मार्फत केंद्र सरकारच्या निधीतून खालापूर ते खंडाळा घाटापर्यंत मुंबई-पुणे जुना महामार्ग रुं दीकरणाचे काम सुरू आहे. खालापूर ते चिंचवली फाटापर्यंत काम वर्कआॅर्डरप्रमाणे सुरू आहे. मात्र, खोपोली शीळफाटा ते खोपोली शहरात सदर कामे होताना दोन्ही बाजूंनी रस्त्याची रुंदी जाणीवपूर्वक कमी ठेवण्यात येत आहे.वर्कआॅर्डरनुसार दोन्ही बाजूंनी नऊ मीटर रस्ता रुं द व १ मीटर साइटपट्टी त्या बाजूला गटारासाठी जागा, असे नियोजन आहे. प्रत्यक्षात मात्रदोन्ही बाजूस सहा मीटरच्या आसपास रु ंदीचाच रस्ता केला जात असल्याची तक्रार मसुरकर यांनी केलीआहे.रस्ता वर्कआॅर्डरप्रमाणे रुंद करण्यात कोणतीही अडचण नसताना, रस्ता अरुंद करून संबंधित ठेकेदार खोपोलीतील जनता, राज्य व केंद्र सरकार व राज्य रस्ते विकास महामंडळ यांची फसवणूक करीत असल्याचा आरोपही मसुरकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी आमदार सुरेश लाड व खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडेही माहिती दिली असल्याचे सांगितले.
महामार्र्ग रुंदीकरणात ठेकेदाराची मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:36 AM