जिल्ह्यातील नद्यांची जलपातळी नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 03:34 AM2017-07-22T03:34:42+5:302017-07-22T03:34:42+5:30

रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद माथेरान येथे १२७ मि.मी. झाली आहे. जिल्ह्यात

Control of the water level of the rivers in the district | जिल्ह्यातील नद्यांची जलपातळी नियंत्रणात

जिल्ह्यातील नद्यांची जलपातळी नियंत्रणात

Next

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद माथेरान येथे १२७ मि.मी. झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी अलिबाग ४२ मि.मी., पेण ७०.४० मि.मी., मुरु ड ६९ मि.मी., पनवेल ६८ मि.मी., उरण ३५ मि.मी., कर्जत १०९ मि.मी., खालापूर ९२ मि.मी., माणगाव ९४ मि.मी., रोहा ५२ मि.मी., सुधागड ५४.३३ मि.मी., तळा ७२ मि.मी., महाड ७६ मि.मी., पोलादपूर ८२,
म्हसळा ८५.२० मि.मी., तर श्रीवर्धन येथे ६३ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७४.४३ मिमी आहे.
जिल्ह्यात सततच्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. मात्र सर्व नद्यांची पातळी पूररेषेच्या खाली असल्याने सद्यस्थितीत धोका नसल्याची माहिती आपत्ती निवारण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. कुंडलिका नदीची पूरपातळी २३.९५ मीटर असून डोलवहाळ येथे प्रत्यक्ष जलपातळी २३ मीटर आहे. अंबा नदीची पूरपातळी ९ मीटर असून नागोठणे येथे प्रत्यक्ष जलपातळी ६.३० मीटर, सावित्री नदीची पूर पातळी ६.५० मीटर असून महाड येथे प्रत्यक्ष जलपातळी ५ मीटर, पाताळगंगा नदीची पूर पातळी २१.५२ मीटर असून लोहप येथे प्रत्यक्ष जलपातळी १८.५० मीटर, उल्हास नदीची पूर पातळी ४८.७७ मीटर असून कर्जत येथे प्रत्यक्ष जलपातळी ४४.५० मीटर तर गाढी नदीची पूरपातळी ६.५५ मीटर असून पनवेल येथे प्रत्यक्ष जलपातळी ३ मीटर आहे.
दरम्यान, आगामी २४ तासांत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.

शंभर वर्षांपूर्वीचा वड कोसळला
श्रीवर्धनहून बोर्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दांडगुरी येथे शंभर वर्षांपूर्वीचे वडाचे झाड कोसळल्याने संपूर्ण मार्ग बंद झाला आहे. श्रीवर्धन- बोर्ली रस्त्यालगत अनेक जुनी झाडे असून पावसाळ्यात केव्हाही कोसळण्याची दाट शक्यता आहे. मार्गावरून दिवस-रात्र वाहतूक सुरू असते. श्रीवर्धन मार्गे बोर्लीपंचतन दिघी हा प्रमुख रस्ता असून दिवेआगर, दिघी या भागात येणारे पर्यटक याच रस्त्यावरून येतात. मात्र झाड कोसळल्याने मार्गावर कोणतेही वाहन नसल्याने जीवितहानी टळली असून या मार्गावरील अशी जुनी झाडे संबंधित खात्याने काढावीत, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या चालक-मालकांकडून केली जात आहे.

ताराबंदर येथे
मंदिर, घराचे नुकसान
बोर्ली-मांडला : मुरु ड तालुक्यात रविवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताराबंदर (कोलमांडला) येथील शिवमंदिर, गावदेवी मंदिराचे नुकसान झाले. याशिवाय येथील रहिवासी संदेश पांडुरंग शिवाजी यांच्या घरांचे नुकसान झाले आहे.

महामार्गावर वाहतूककोंडी
वडखळ : मुंबई - गोवा महामार्गावर वडखळ येथील बोरी फाट्याजवळ वडाचे झाड पडल्याने मोठ्या
प्रमाणात वाहतूककोंडी झाली. मुंबई
व गोवा बाजूला जाणाऱ्या दोन्ही मार्गावर जवळपास आठ किमी लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोंडीमुळे तासन्तास
प्रवाशांसह कामगारही अडकून
पडले.

पुलाला भेगा
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरनजीक सडवली व काटेतली फाटा येथे पुलावर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. पोलादपूर तहसीलदार शिवाजी जाधव यांना रस्त्याची पाहणी करून ताबडतोब उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या

Web Title: Control of the water level of the rivers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.