राष्ट्रीय महामार्गावरुन सिगारेट बॉक्सने भरलेला पळवला कंटेनरचे; 2 कोटी रूपयांचा मुद्देमाल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 03:09 PM2017-09-11T15:09:32+5:302017-09-11T15:11:18+5:30
मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्यावरुन शुक्रवारी मध्यरात्री सिगारेटने भरलेल्या एक कंटेनर अज्ञात चोरट्यांनी पळविला.
लोणावळा, दि. 11- मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्यावरुन शुक्रवारी मध्यरात्री सिगारेटने भरलेल्या एक कंटेनर अज्ञात चोरट्यांनी पळविला. या कंटेनरमध्ये 1 कोटी 87 लाख 54 हजार 817 रुपये एवढ्या किंमतीच्या सिगारेटचे 865 बॉक्स होते. यासह 15 लाख रुपये किंमतीचा कंटेनर व रोख रक्कम असा तब्बल 2 कोटी 2 लाख 63 हजार 317 रुपयांचा माल लंपास केला आहे.
याप्रकरणी कंटेनर चालक कलाम अहमद शमिर खान ( वय 41, रा. नवरंग कंपनी प्लॉट नं. 17 धारावी मुंबई) यांच्या फिर्यादीवरुन आठ ते दहा अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादंवी कलम 395 अन्वेय दरोड्याचा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर वरसोली टोलनाक्यापासून साधारण एक किमी अंतरावर काळ्या रंगाच्या स्कॉर्पीओ गाडीमधून आलेल्या आठ ते दहा अज्ञात व्यक्तीनी कंटेनर क्र. (MH 12 HD 6008) आडवून चालकाला बेदम मारहाण करत त्याचे हातपाय व डोळे बांधून कंटेनर पळवून नेहला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील तपास करत आहेत.