रोहा : तालुक्यातील करंजविरा कोपरी येथे गाव टाकणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गावातील दोन गटांत किरकोळ कारणावरुन वाद निर्माण झाल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण होते. रोहा पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट दिली. यामुळे पुढील अनर्थ टळला, असे बोलले जात आहे. करंजविरा कोपरी या गावातील पूर्वानुभव लक्षात घेऊन पोलिसांकडून ग्रामस्थांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. तरीदेखील कालचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गावात धार्मिक सण, उत्सवांदरम्यान होणारे वाद विकोपाला गेल्याने पाले वरवडे येथे एकाचा हकनाक मृत्यू ओढावला होता. या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या १७ जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तरीदेखील तालुक्यात धार्मिक सण, उत्सवांदरम्यान वादंगाचे प्रसंग उद्भवतात, हे चिंतेची बाब आहे.
गाव टाकणीच्या कार्यक्रमात वादंग
By admin | Published: May 06, 2015 1:04 AM