महाराष्ट्र, गोवा, गुजराथ राज्यांच्या बालरोगतज्ञांचे अधिवेशन यंदा रायगडमध्ये; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 03:14 PM2021-11-24T15:14:08+5:302021-11-24T15:15:01+5:30
अधिवेशनानिमित्त अलिबागमध्ये नागरीकांकरिता विविध प्रशिक्षण कार्यशाळा
रायगड: महाराष्ट्र, गोवा व गुजराथ या तीन राज्यांच्या बालरोगतज्ञांचे अधिवेशन रायगड जिल्ह्यातील मुरुड-काशीद येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनानिमित्त अलिबाग येथे सामान्य नागरिक, पालक, पत्रकार, पोलीस, परिचारिका किशोरवयीन पाल्य व डॉक्टरांसाठी सहा ठिकाणी विविध प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या आहेत, अशी माहिती जेष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी येथे दिली.
यात प्रामुख्याने पालकांकरिता डॉक्टर मुले अशी का वागतात (पी.एन.पी. सभागृह), परिचारिकांकरीता नवजात बालकांची शुश्रूषा(जिल्हा परिषद सभागृह), पोलीस कर्मचान्यांकरिता जीवनरक्षक उपचार पद्धती (जंजिरा सभागृह), किशोरवयीन मुलांच्या समस्या (पी.एन. पी.विद्यासंकुल) गुदमरलेल्या बालकांच्या समस्या , एन.आर. पी. वर्कशॉप (मॅपल इन हॉटेल), तर डॉक्टरांसाठी लहान मुलांच्या आजारावर उपचार या संदर्भात जिल्हा परिषद सभागृह सभागृह अशा विविध ठिकाणी या कार्यशाळा गुरुवार २५ नोव्हेंबर संपन्न होत आहेत. या निमित्ताने वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदशर्न संबंधितांना उपलब्ध हाणार आहे.
सर्व पालक , नागरिक, पोलीस कर्मचारी, पालक, परिचारीका व डॉक्टर्स यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन या अधिवेशनाचे प्रमुख संयोजक, डॉ. हेमंत गंगोलिया, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. चंद्रशेखर दाभाडकर (महाड), डॉ. विनायक पाटील ( अलिबाग) व डॉ. राजेंद्र चांदोरकर (अलिबाग) यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता डॉ. विनायक पाटील व डॉ. राजेंद्र चांदोरकर यांचेशी संपर्क साधावा. या कार्यशाळेकरिता कोव्हीड संबंधातील सर्व सामाजिक नियमांचे पालन करण्याच्या सर्व सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत,असे डॉ. विनायक पाटील यांनी सांगितले.