शांततेसाठी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2015 12:18 AM2015-07-10T00:18:12+5:302015-07-10T00:18:12+5:30
रोहा हे शांतताप्रिय शहर असून याठिकाणी सर्व जाती-धर्मीय बांधव गुण्यागोविंदाने राहतात. असे असताना काही पोरकट तरु णांच्या गैरकृत्यामुळे रविवारी रात्री
रोहा: रोहा हे शांतताप्रिय शहर असून याठिकाणी सर्व जाती-धर्मीय बांधव गुण्यागोविंदाने राहतात. असे असताना काही पोरकट तरु णांच्या गैरकृत्यामुळे रविवारी रात्री घडलेल्या प्रकाराने शहरातील शांततेला गालबोट लागले. असे असताना परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल खाते व सरकारी यंत्रणेबरोबर स्थानिक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहकार्याची भूमिका घेत आपली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला. असे सांगत भविष्यात शहरातील शांतता, कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वधर्मीय बांधवांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कोकण विभाग पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे यांनी केले.
रोहा शहर पोलीस ठाण्यात
गुरु वारी दुपारी कोकण विभाग पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेत उपस्थित सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत दोन्ही गटांतील वाद आपसात मिटलेला असून दोन्ही गटांपैकी कोणीही तक्र ार केलेली नाही. त्यामुळे दोन्ही गटांतील तरु णांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी दोन्ही समाजांतील प्रतिष्ठित नागरिकांनी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक, आमदार अवधूत तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी संपूर्ण रोहेकरांना शांततेचे आवाहन केले. ते म्हणाले, दोन्ही गटांतील लोकांवर नाहक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याविषयाची स्थानिक पोलिसांमार्फत चौकशी करून नाहक गोवण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आरोपींच्या यादीतून वगळण्यात येतील. शहरात झालेल्या हाणामारी प्रकाराची व्हिडीओ शूटिंग पोलिसांनी केली आहे. या शूटिंगद्वारे आरोपींवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)