शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

कोरोना रुग्णांचा आधार ठरत आहेत परिचारिका, मनात सतत कुटुंबाची भीती, अनेकींच्या मुलांना मिळेना आईच्या मिठीची उब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:36 AM

जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी गेले १४ महिने रुग्णांना मायेची ऊब देऊन आधार दिला आहे. रुग्ण हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या परिचारिकांचा आजचा दिवस आहे. त्या अविरतपणे रुग्ण सेवा करीत आहेत. कोरोनाने निष्पापांना लक्ष्य करून लाखो नागरिकांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे.

निखिल म्हात्रे -अलिबाग : माणूस अंथरुणाला खिळला, एकदा आजार जडला की रक्ताचे नातेही सैल होते. आपलीच माणसे आपल्यापासून दुरावतात. अशावेळी कुठलेही रक्ताचे नाते नसताना आणि कोणत्याही नात्याचे संबंध नसताना रुग्णालयात आपली म्हणून साथ देते, औषध देते, मानसिक आधार देते ती म्हणजे परिचारिका. जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी गेले १४ महिने रुग्णांना मायेची ऊब देऊन आधार दिला आहे. रुग्ण हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या परिचारिकांचा आजचा दिवस आहे. त्या अविरतपणे रुग्ण सेवा करीत आहेत. कोरोनाने निष्पापांना लक्ष्य करून लाखो नागरिकांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे. त्यामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी डाॅक्टर, परिचारिका, वाॅर्डबाॅय तसेच सफाई कर्मचारी आपल्या जीवाचा विचार न करता कर्तव्य बजावत आहेत. तसेच कुटुंबापासून दूर असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना आधारही देत आहेत.रुग्णांच्या जवळ २४ तास कोणी असेल तर त्या परिचारिका आहेत. या परिचारिकांना आपले कुटुंब देखील आहे. रुग्ण सेवा करून घरी परतत असताना मी माझ्या सोबत काही घेऊन तर जात नाही ना, ज्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला नाहक त्रास होईल, अशी भीती कायम मनात सतावत असते. याच कारणासाठी घरी परतत असताना रुग्णालयातील स्टाफ नर्सना असलेला ड्रेस कोड तेथेच ठेऊन दुसरे कपडे परिधान करून घरची वाट धरावी लागत आहे. अंघोळ करूनच कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या लहान मुलांनाही अंगवळणी पडले आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवस ते सुद्धा थेट त्यांच्या आईला बिलगत नाहीत.

प्रशिक्षणामुळे भीती झाली दूरकोरोनाग्रस्त रुग्णाच्या जवळ कसे जायचे, आपल्याला काही झाले तर, त्याचा संसर्ग आपल्या कुटुंबातील सदस्याला होईल अशी भीती मनामध्ये घर करीत होती. मात्र सरकारने योग्य प्रशिक्षण दिल्याने परिचारिका रुग्णालयातील एक परिवार आणि घरी एक परिवार यांच्यात ताळमेळ घालून काम करत आहेत.

कोरोनाच्या दहशतीमुळे रुग्णाजवळ जाताना भीती वाटायची. मात्र योग्य प्रशिक्षणामुळे आता भीती वाटत नाही. रुग्ण हे आपल्या विश्वासावरच रुग्णालयात भरती झालेले असतात. त्यामुळे त्यांना बरे करून सुखरुप त्यांच्या घरी पाठवणे हेच ध्येय आता उराशी बाळगले आहे. जिल्हा रुग्णालयातील रुग्ण हा जरी आमच्या ओळखीचा नसला तरी तो आपल्याच परिवारातील एक आहे.- प्रतीक्षा मुल्ल्या, कोविड वाॅर्ड-जिल्हा रुग्णालय.

रुग्ण कोणत्या ठिकाणचा आहे यापेक्षा तो आपल्या विश्वासावर आला आहे. त्यामुळे निश्चितच आमच्यावरील जबाबदारी वाढत आहे. रुग्णांची काळजी घेताना त्याहून अधिक काळजी आम्हाला आमच्या घरी जाताना घ्यावी लागते.    -प्रभा तारी, जिल्हा रुग्णालय.

मागील महिनाभरापासून मी कोविड आयसोलेशन वाॅर्डमध्ये काम करीत आहे. रुग्णांची शुश्रूषा करीत असताना मलाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र रुग्णांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे १४ दिवसातच मी पूर्ण बरी झाले. पंधराव्या दिवशी पुन्हा मी माझ्या कर्तव्यास हजर झाले. ते आजही अविरतपणे काम पूर्णत्वास नेत आहे. घरी तीन वर्षाचे माझे बाळ आहे. त्याची पूर्ण जबाबदारी घेऊनच माझ्या कुटुंबाच्या सहकार्यामुळे मी अविरतपणे रुग्णांना सेवा देत आहे.- सुचिता पाटील, कोविड वाॅर्ड-जिल्हा रुग्णालय.

जनकल्याण समितीतर्फेही सन्मानरा. स्व. संघ जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांच्यासह संघाचे तालुका कार्यवाह अविनाश मोरे, जिल्हा कार्यकर्ते रोहित कुलकर्णी, सचिन कुंटे, ज्येष्ठ पत्रकार जयवंत माडपे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त डॉक्टर डोंगरे, डॉक्टर वानखेडे, डॉक्टर ठाकूर यांच्या रुग्णालयात जाऊन तेथील परिचारिकांचा गुलाबपुष्प आणि कॅडबरी चॉकलेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

खोपोली : कोरोनाचे महाभयानक संकट असूनही आज जगभरात सर्व दवाखान्यांत आपल्या घरादाराची पर्वा न करता रुग्णांची सेवा करण्यात मग्न आहेत. खोपोलीत सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व कोरोनासाठी उपचार देणारे डॉ. कुलकर्णी हॉस्पिटल व जाखोटीया हॉस्पिटल येथील परिचरिकांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. फळांचा राजा आंबा, फुलांचा राजा गुलाब व सन्मानाचा राजा श्रीफळ देऊन परिचरिकांचा गौरव करण्यात आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस