- सिकंदर अनावरे दासगाव : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना वायरसने महाडमध्ये सध्याच्या परस्थितीत मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. सुरुवातीला हा कोरोनाबधितांचा आकडा कमी होता, परंतु गेल्या काही दिवसांपासून आकड्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत असताना दिसून येत आहे. शनिवारी एक दिवसात तब्बल ९० रुग्ण आढळल्याने, तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामानामध्ये सारखे बदल होत असल्यामुळे तालुक्यामध्ये तापाच्या रुग्णांच्या संख्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हजारो रुग्ण ठिकठिकाणी उपचार घेत असून, काही तापाचे रुग्ण कोरोनाच्या भीतीने तपासणी न करता घरी बसून आहेत. महाड तालुका सुरक्षित आहे, असे सुरुवातीला वाटत होते. मात्र, असे न होता गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या चार महिन्यांत संख्या कमी होती. मात्र, एक महिन्यापासून रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होताना दिसून येत आहे.
आजच्या आकडेवारीमध्ये महाड तालुक्याने एक हजाराचा आकडा पार केला असून, ही संख्या १,१२७ वर पोहोचली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही मोठी असून, ८४० रुग्णांनी करोनावर मत केली आहे. सध्या २४१ रुग्ण उपचार घेत असून, ४६ जणांचा मूत्यू झाला आहे. शुक्रवारी एक दिवसात तब्बल ९० रुग्णांची नोंद झाली. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
काही दिवसांपासून येथे तापाच्या आजाराने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या भीतीने खासगी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर उपचार न देता सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे या तापाच्या रुग्णांना सध्यातरी वेळीच उपचार मिळत नसल्याचे समोर येत आहे. ताप आहे, आपण सरकारी दवाखान्यात गेलो, तर आपण कोरोना पॉझिटिव्ह येऊ, या भीतीनेही हजारो रुग्ण या साध्या तापाच्या आजारावर उपचार घेऊ शकत नाहीत.
दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, दासगावमधील एक खासगी दवाखाना आणि वाहूरमधील एक खासगी दवाखाना या तीन ठिकाणी सध्या परिसरातील नागरिकांना वेळीच उपचार मिळत असल्याने एक दिलासा आहे. सर्दी-खोकला आणि तापाचे रुग्ण या तीन ठिकाणी मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. तालुक्यातील ज्या-ज्या नागरिकांना ही तीन ठिकाणे माहिती होत आहेत, तसे तशी दरदिवस गर्दी होत आहे. येथील डॉक्टर चांगल्या पद्धतीत रुग्णांना सेवा देत आहेत. गेले दोन महिने या तीन ठिकाणांहून हजारो रुग्ण उपचार घेऊन बरे झाले.
आज महाड तालुक्यात अनेक डॉक्टर आहेत की, ते कोरोनाच्या भीतीने आपले दवाखाने बंद करून बसले आहेत आणि जरी उघडे ठेवले असले, तरी अशा रुग्णांना उपचार देत नाहीत. तरी प्रशासनाने वेळीच याची दखल घ्यावी, जेणेकरून साध्या साध्या आजारावर रुग्णांना उपचार मिळू शकतील.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मोफत अॅन्टीजेन चाचणी
तळा : रायगड प्राथमिक आरोग्य केंद्र तळाचे वैद्यकीय अधिकारी अमोल बिरवाडकर यांनी पुढाकार घेऊन पंचायत समिती महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अॅन्टीजेन टेस्टची सुरुवात १९ आॅगस्टपासून टप्प्याटप्प्याने शासनाच्या अटी व नियमांचे पालन करून सुरू करण्यात आली. तळा तालुक्यातील जवळपास शंभर ते दिडशे अंगणवाडी कर्मचारी यांची अॅन्टीजेन टेस्ट घेण्यात आली.
उरणमध्ये कोरोनाच्या नवीन २० रुग्णांची नोंद
उरण : उरण परिसरात ६ सप्टेंबर रोजी नव्याने आणखी २० रुग्णांची नोंद झाली आहे, तर २० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.रण तालुक्यातील आजतागायत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १,४८६ पर्यंत पोहोचली आहे. यापैकी आजतागायत १,१९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर सध्या अॅक्टिव्ह असलेल्या २२१ पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
तळा तालुक्यात एकाच दिवशी आढळले १४ रुग्ण
तळा : तळा तालुक्यात एकाच दिवशी १४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा ७३ वर जाऊन पोहोचला आहे.ाजपर्यंत ४३ रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून सुखरूप आपल्या घरी परतले आहेत. गेल्या पाच महिन्यांत ३ रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत, तर २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असले, तरी दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.