जिल्हाधिकारी कार्यालयात आढळले कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:46 AM2020-07-31T00:46:21+5:302020-07-31T00:46:33+5:30

निर्जंतुकीकरणासाठी दोन दिवस काम बंद

Corona positive found in collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयात आढळले कोरोना पॉझिटिव्ह

जिल्हाधिकारी कार्यालयात आढळले कोरोना पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्हाधिकारी कार्यालयात दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत सर्वत्र निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय ३० आणि ३१ जुलै रोजी बंद राहणार आहे.


सद्य:स्थितीत रायगड जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. तपासणी अहवालात जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आपलेच सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कार्यालयातच भीतीचे वातावरण होते. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांना कोणताही त्रास नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाºया नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ३० आणि ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले.

३ आॅगस्टला कामकाज सुरू
च्१ आणि २ आॅगस्ट रोजी सरकारी सुट्टी असल्याने आता थेट ३ आॅगस्टपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय नियमितपणे सुरू होणार आहे. या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व दालने, शाखा, परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

Web Title: Corona positive found in collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.