रायगडमध्ये चाकरमान्यांमुळे पसरतोय कोरोना; जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने नागरिक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 01:38 AM2020-05-26T01:38:39+5:302020-05-26T01:38:51+5:30

महानगरात वाढणाऱ्या संसर्गाच्या भीतीने गावाकडे धाव

Corona is spreading in Raigad due to servants; Millions of citizens enter the district | रायगडमध्ये चाकरमान्यांमुळे पसरतोय कोरोना; जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने नागरिक दाखल

रायगडमध्ये चाकरमान्यांमुळे पसरतोय कोरोना; जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने नागरिक दाखल

googlenewsNext

- आविष्कार देसाई

अलिबाग : महानगरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावापुढे नागरिक हतबल झाले आहेत. कोरोना आपल्याला चिकटण्याआधी आपणच कोरोनापासून दूर जाऊया या भावनेने लाखोंच्या संख्येने चाकरमानी नागरिकांनी आपल्या गावाकडचे घर गाठण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा आलेख चढता राहिल्याचे दिसून येते.

कोरोनाचा हाहाकार सर्वत्रच झपाट्याने वाढतच चालला आहे. हजारो नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईसारख्या महानगरांमध्ये कोरोनाने आपले चांगलेच बस्तान बसवले आहे. कोरोनाला पोषक असणारे वातावरण नागरिकांकडूनच तयार केले जात असल्याने तो मानवी वस्तींच्या मुळावर उठला आहे. एकामागून एक अशा झपाट्याने कोरोनाने नागरिकांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे.

काम-धंद्यानिमित्त कोकणातील नागरिक मोठ्या संख्येने या महानगराकडे वळली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्याचा आकडा सर्वाधिक आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हेच नागरिक जीव वाचवण्यासाठी गावाकडे येत आहेत. आपल्या गावीच त्यांना सुरक्षित वाटत असल्याने लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच जिल्ह्यामध्ये एक लाख ३६ हजार चाकरमानी आले होते. त्यानंतर संचारबंदी आणि लॉकडाउनमुळे सर्वत्रच कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात चाकरमानी नागरिक येण्याला बºयापैकी ब्रेक लागला होता. दुसºया आणि तिसºया लॉकडाउनमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत होता.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती, तर दुसरीकडे कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला होता. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये कमालीची शिथिलता दिल्याने चाकरमानी नागरिकांनी ही संधी सोडली नाही. अधिकृत मार्गाने त्यांनी पुन्हा रायगडची वाट धरली. आतापर्यंत सुमारे सव्वा लाखाहून अधिक नागरिक आल्याचे समजते. येणारे नागरिक हे रेड झोन आणि कोरोनाबाधित क्षेत्रातून येत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात कमतरता, गर्दीच्या ठिकाणी जाणे, सातत्याने हात न धुणे, मास्कचा वापर न करणे अशा कारणांनी कोरोनाने नागरिकांना गाठले आहे.

रायगडमध्ये ७५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

सुरुवातीला पनवेल महापालिका, पनवेल ग्रमीण याच ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. मात्र कोरोनाने आता उरणपासून ते थेट पोलादपूरपर्यंत हाहाकार पसरवला आहे. २४ मेपर्यंत पनवेल महापालिका आणि पनवेल ग्रामीणमध्ये ५२२ रुग्णांची संख्या होती, तर अन्य १३ तालुक्यांमध्ये २३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आकडा ७५८ वर जाऊन पोहोचला आहे. त्यामध्ये ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३१७ रुग्णांवर उपचार सुरू होते.

Web Title: Corona is spreading in Raigad due to servants; Millions of citizens enter the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.