शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
3
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
4
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
8
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
9
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
10
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
11
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
12
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
13
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
14
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
16
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
17
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

Corona Vaccination: काेराेना लसींचा साठा संपला; 50 लसीकरण केंद्रे बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 12:17 AM

जिल्ह्यात महाविस्फाेट हाेण्याची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहावे

- आविष्कार देसाईरायगड : जिल्ह्यातील काेराेना लसीचा साठा संपल्याने ८० पैकी ५० लसीकरण केंद्रांना टाळे लागले आहे. पुढील दाेन दिवसांमध्ये लस उपलब्ध झाली नाहीतर अखंड जिल्ह्यातील काेराेना लसीकरण ठप्प पडणार असल्याचे चित्र आहे. काेराेनाचा आकडा सातत्याने वाढत असताना दुसरीकडे मात्र लस उपलब्ध हाेत नसल्याने जिल्ह्यात काेराेनाचा महाविस्फाेट हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.जिल्ह्यात काेराेनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डाेके वर काढले आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. वाढत्या काेराेनाला आळा घालण्यासाठी देशभरातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने लसीकरण सुरू केले आहे. केंद्र सरकारकडूनच राज्य सरकारांना मागणीनुसार लसींचा पुरवठा केला जाताे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये ८० लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले. त्या लसीकरण सेंटरमार्फत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १५ हजार ३५८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ३५ हजार ६७० आराेग्यसेवक आणि फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली आहे. तसेच ४५ वर्षांच्या पुढे असणारे २३ हजार ९५७ नागरिक आहेत. ५५ हजार ७३१ ज्येष्ठ नागरिकांनीही लस घेतली आहे. जिल्ह्याला सुमारे एक लाख ३० हजार काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन लसी प्राप्त झाल्या हाेत्या. राज्य सरकारने पाठवलेल्या लसींचा साठा संपत चालला आहे. लसी अपुऱ्या असल्याने ८० पैकी ५०हून अधिक लसीकरण सेंटर बंद झाली आहेत, तसेच पुढील दाेन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. राज्य सरकारकडे दीड लाख लसींची मागणी करण्यात आली आहे. मात्र दाेन दिवसांत ती उपलब्ध झाली नाही तर लसीकरण पूर्णतः थांबणार आहे. नागरिकांची इच्छा असूनही त्यांना लस घेता येणार नाही.केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लसींचा पुरवठा हाेता. राज्य सरकारकडे जिल्ह्याची मागणी नाेंदवण्यात आलेली आहे. मात्र राज्य सरकारकडेच केंद्र सरकारने लसींचा पुरवठा केलेला नाही, अशी खरी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काही ठिकाणचे लसीकरण थांबले आहे. तसेच पुढील दाेन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याने अन्य ठिकाणचेही लसीकरण बंद करावे लागणार आहे. लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण सुरू करण्यात येईल.- निधी चाैधरी, जिल्हाधिकारी, रायगडमुरूड ग्रामीण रुग्णालयातील लसीचा पुरवठा संपलाआगरदांडा : मुरूड ग्रामीण रुग्णालयात ७ मार्चपासून ६० वर्षांवरील आणि १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केल्याने लस घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळेही भीतीपोटी अनेक जण पुढे होऊन लस घेण्यासाठी येत आहेत. आतापर्यंत मुरूड ग्रामीण रुग्णालयात ८१९ नागरिकांना लस देण्यात आली. कोरोनाची रुग्णसंख्या रोखायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल, असे मुरूडचे तहसीलदार गमन गावित यांनी सांगितले. या अंनुषगाने तालुक्यातील नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात जात आहेत; परंतु बुधवारी लसीचा पुरवठा संपल्याने आलेल्या अनेक नागरिकांना लस न घेताच परतावे लागले.कोरोना लसीचा पुरवठा संपल्याबाबत डाॅक्टर दिव्या सोनम यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की कालच आम्ही जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीचा पुरवठा संपल्याचे कळवलं होते, तसेच आम्हाला लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती; परंतु तिथेही लसीचा तुटवडा असल्याने आम्हाला लस मिळू शकली नाही; परंतु प्राथमिक केंद्र मुरूड-बोर्ली येथे कोरोना लसीचे ५० डोस उपलब्ध आहेत. ते डोस आम्हाला उपलब्ध करून द्यावेत याकरिता आम्ही मागणी केली होती. दुपारपर्यंत आम्हाला लसीचे डोस मिळणार आहेत. तरी आलेल्या नागरिकांना लसीचा डोस देण्यात येईल; परंतु उर्वरित नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे. लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस