corona vaccination : लस जरा जपूनच वापरा, सरकारचे अलिखित फर्मान, १ एप्रिलपासून हाेणाऱ्या लसीकरणाला फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:17 AM2021-03-31T02:17:17+5:302021-03-31T02:18:01+5:30

corona vaccination:  रायगड जिल्ह्यात काेराेनाचा कहर वाढत असतानाच काेराेना लसींचा तुटवडा जाणवत आहे. दीड लाख लसींची मागणी केली आहे मात्र अद्याप प्राप्त झालेली नाही.

corona vaccination: Use the vaccine with caution, unwritten government decree, vaccination from April 1 may be affected | corona vaccination : लस जरा जपूनच वापरा, सरकारचे अलिखित फर्मान, १ एप्रिलपासून हाेणाऱ्या लसीकरणाला फटका बसण्याची शक्यता

corona vaccination : लस जरा जपूनच वापरा, सरकारचे अलिखित फर्मान, १ एप्रिलपासून हाेणाऱ्या लसीकरणाला फटका बसण्याची शक्यता

Next

-  आविष्कार देसाई
 रायगड : जिल्ह्यात काेराेनाचा कहर वाढत असतानाच काेराेना लसींचा तुटवडा जाणवत आहे. दीड लाख लसींची मागणी केली आहे मात्र अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यातच आहे तीच लस जपून वापरा असे अलिखित फर्मान सरकारने काढले आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील तब्बल साडेसात लाख नागरिकांना करण्यात येणाऱ्या लसीकरणाला फटका बसणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील लाेकसंख्येच्या २६ टक्के लाेकसंख्या ही ४५ वर्षाच्या वरील आहे. सुमारे साडे सात लाख नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आराेग्य यंत्रणेने ठेवले आहे. यासाठी तब्बल १६ लाख काेराेनाची लस लागणार आहे. सध्या ८० लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. 
सुमारे १४० लसीकरण केंद्र उभारल्यानंतरच आणि मागणी केलेली लस उपलब्ध झाल्यावरच उद्दिष्ट गाठणे शक्य हाेणार आहे. सध्या जिल्ह्यात फक्त सुमारे १० हजार लस उपलब्ध आहे. तसेच दीड लाख लसीची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप ती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे लसीकरण कसे करणार असा प्रश्न आराेग्य व्यवस्थेसमाेर उभा आहे.

४५ वर्षांपुढील साडेसात लाख नागरिकांना करावे लागणार लसीकरण
जिल्ह्याच्या लाेकसंख्येच्या २६ टक्के म्हणजेच तब्बल साडेसात नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये व्याधी असणाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणावर लसीकरण करायचे असेल तर जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यांमध्ये किमान १४० ठिकाणी सुट्टी वगळता लसीकरण केंद्र सुरु करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे सुमारे १६ लाख लस उपलब्ध हाेणे गरजेचे आहे. यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या मागणी केलेली लस उपलब्ध झालेली नाही. लसीचा तु़डवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण कसे करणार असा प्रश्न आहे.

सध्या मागणी किती, साठा मिळताे किती...
जिल्ह्याला आतापर्यंत ८० हजार ६४४ लस उपलब्ध झालेली आहे. तसेच ती लाभार्थ्यांना टाेचूनही झालेली आहे. सध्या दीड लाख लसींची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप प्राप्त झालेली नाही. लस जपून वापरा असे अलिखित निर्देश सरकारने दिले आहेत. त्यामुळे एवढ्या माेठ्या लाेकसंख्येला लसीकरण कसे करायचे असा प्रश्न आराेग्य व्यवस्थेसमाेर उभा आहे.

सध्या ४५ वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना काेराेनाची लस देण्यात येणार आहे. तब्बल साडेसात लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १६ लाख डाेस लागणार आहेत. सरकारकडे सध्या दीड लाख लसींची मागणी केली आहे. ती लवकरच प्राप्त हाेईल.
- डाॅ.गजानन गुंजकर (निवासी वैद्यकीय अधिकारी, 
जिल्हा सरकारी रुग्णालय)

Web Title: corona vaccination: Use the vaccine with caution, unwritten government decree, vaccination from April 1 may be affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.