Corona Vaccine : रायगड जिल्ह्यासाठी मिळणार १४ हजार काेविशिल्डचे डाेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 12:44 AM2021-04-11T00:44:57+5:302021-04-11T00:45:19+5:30

Corona Vaccine : रायगड जिल्ह्यासाठी काेविशिल्डची एक लाख ३४ हजार २०० तर १५ हजार ८२० काेव्हॅक्सिन अशी एकूण १ लाख ५० हजार २० लस प्राप्त झाली हाेती.

Corona Vaccine: Raigad district will get 14,000 caveshields | Corona Vaccine : रायगड जिल्ह्यासाठी मिळणार १४ हजार काेविशिल्डचे डाेस

Corona Vaccine : रायगड जिल्ह्यासाठी मिळणार १४ हजार काेविशिल्डचे डाेस

Next

रायगड : जिल्ह्यासाठी नव्याने १४ हजार काेविशिल्डचे डाेस पुण्यावरून रवाना झाले आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत सदरचे डाेस उपलब्ध हाेणार आहेत. १४ हजार डाेसपैकी पनवेल महानगर पालिकेसाठी ७ हजार डाेस मिळणार आहेत. उरलेले ७ हजार डाेस रायगड जिल्ह्याच्या वाट्याला येणार आहेत. त्यामुळे लसीकरणाला पुन्हा सुरुवात हाेणार असल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्ह्यासाठी काेविशिल्डची एक लाख ३४ हजार २०० तर १५ हजार ८२० काेव्हॅक्सिन अशी एकूण १ लाख ५० हजार २० लस प्राप्त झाली हाेती. आतापर्यंत ३६ हजार ६३ आराेग्य सेवक आणि फ्रंट लाईन वर्कर यांना लस टाेचण्यात आली आहे. ४५ वर्षावरील ३२ हजार १८१, ज्येष्ठ नागरिक ६० हजार ३६७ लाभार्थ्यांना लस टाेचण्यात आली आहे. दुसरा डाेस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या १४ हजार ७१३ आहे. त्यानुसार १ लाख ४३ हजार ३२४ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सदरची आकडेवारी ९ एप्रिलपर्यंतची आहे. काही ठिकाणचा लसींचा साठा संपल्याने सध्या ८४ पैकी ४८ लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. लसीकरणासाठी नागरिक विविध लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. लसींचा साठा संपल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
जिल्ह्यातील लसीकरण सुरू राहावे यासाठी जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी थेट पुण्याचा मुख्य कार्यालयाकडून १४ हजार लसींची मागणी केली. त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत त्या उपलब्ध हाेणार आहेत, असे जिल्हा काेविड लसीकरणाचे समन्वयक डाॅ. गजानन गुंजकर यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले. 
लस प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील १४ हजार लाभार्थ्यांना त्याचा लाभ हाेणार आहे. १४ हजार लसींपैकी ७ हजार लसींचा पुरवठा पनवेल महानगरपालिकेला करण्यात येणार आहे, तर उर्वरित लस ही रायगड जिल्ह्याच्या वाट्याला येणार आहे. त्यानुसार किमान ५० केंद्रांवर सरासरी १४० लसी प्राप्त हाेणार असल्याचे बाेलले जाते. त्यामुळे पुन्हा दाेन दिवसांमध्ये लस संपून गाेंधळ उडण्याची शक्यता आहे.

Web Title: Corona Vaccine: Raigad district will get 14,000 caveshields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.