आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यात परदेशातून आतापर्यंत 214 नागरिक भारतामध्ये परतले आहेत. पैकी 168 नागरिकांना जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या निगरानी कक्षात ठेवण्यात आले आहे, तर 46 नागरिकांना त्यांच्याच घरी निगराणीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकिसत्सक डॉ. प्रमोद गवई यांनी लोकमतशी बोलताना दिली.
कोरानाच्या धसक्याने सवर्त्रच खळबळ माजली आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. कामानिमीत्त परदेशातून भारतात परतनाऱ्या नागिराकांवर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 214 नागरिक परतले आहेत. पैकी 168 नागिरकांना जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या निगरानी कक्षात, तर 46 नागिरकांना त्यांच्या राहत्या घरीच निगरानीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये कोरानाची कोणतीच लक्षणे दिसत नसली तरी त्यांना किमान 14 दिवस निगरानी खाली ठेवण्यात येणार आहे. कोरानाची लक्षणे आढळल्यास त्या नागिरकांला तातडीने विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे, असेही डाॅ. गवई यांनी स्पष्ट केले.दरम्यान, रायगड जिल्ह्यात एकच कोरोना बाधीत रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे सांगितले. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, काळजी घ्यावी, हात स्वच्छ धुवावेवत, शिंकताना, खाेकताना रुमालाचा वापर करावा असे आवाहन डॉ. गवई यांनी केले.