- निखिल म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या ३१६ जणांपैकी १०३ जणांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकली असून ते सुखरूप आपल्या घरी परतले आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २०३ जणांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता स्वत:ची काळजी घेण अत्यावश्यक आहे.रायगड जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. जिल्ह्यात दाखल झालेल्या एक हजार ५४३ व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यामधील तपासणीअंती एक हजार १९७ व्यक्तींंचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात ३१६ जणांना कोरोनाची लागण झाली असून आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे १०३ रुग्णांनी कोरोनाला हरवून माणसाची जगण्याची जिद्द सिद्ध केली आहे. या १०३ कोरोनाबाधित रुग्णांना बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे. दुर्देवाने १० जणांचे जगण्याचे प्रयत्न असफल झाले.जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद यंत्रणा, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि रायगडकर जनता या सर्वांच्या एकजुटीतून जिल्ह्यात कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी होईल, त्यामुळे नागरिकांनी बऱ्या होणाºया नागरिकांची संख्या पाहता शासकीय यंत्रणेवर विश्वास ठेवावा, शासनाकडून देण्यात येणाºया सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले आहे.
coronavirus: रायगडमध्ये १०३ जणांची कोरोनावर मात, २०३ रु ग्णांची प्रकृती उत्तम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 1:19 AM