coronavirus: म्हसळ्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात नव्याने १७ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:22 AM2020-07-08T00:22:48+5:302020-07-08T00:22:59+5:30

ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये असणाऱ्याप प्राथमिक आरोग्य केंद्रा नंतर तहसील कार्यालय,स्टेट बँक व नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवलातून स्पष्ट झाले आहे.

coronavirus : 17 new Corona Positive patient found in Mhasala | coronavirus: म्हसळ्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात नव्याने १७ रुग्णांची नोंद

coronavirus: म्हसळ्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात नव्याने १७ रुग्णांची नोंद

Next

म्हसळा - शहरासहित तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाने थेट सरकारी कार्यालयात आपली उपस्थिती नोंदवली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये असणाऱ्याप प्राथमिक आरोग्य केंद्रा नंतर तहसील कार्यालय,स्टेट बँक व नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवलातून स्पष्ट झाले आहे. खबरदारी घेत तहसील कार्यालय व नगरपंचायत पुढील व स्टेट बँक दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.

मंगळवारी म्हसळा शहरासहित तालुक्यात कोरोनाचे १७ रुग्ण आढळले आहे. एका दिवसात सापडणाºया कोरोना रुग्णांचा हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक असून तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील एका मृत व्यक्तीच्या कुटुंबातील चार जणांना, गोंडघर येथील आरोग्य सेवेत कार्यरत असणाºया मृत व्यक्तीच्या कुटुंबातील चार जणांना, गौळवाडी परिसरातील एका तरुणाला, शहरातील सोनार आळी येथील एका महिलेला, शहरातील एक बेकरी मालकाला, शहरातील एक भाजी विक्रे त्याला, शहरातील एक हार विक्रे त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

बँक व्यवस्थापकाला बाधा
तहसील कार्यालयातील एका कर्मचाºयाला, नगरपंचायतीमधील एका कर्मचाºयाला, म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाºयाच्या पत्नीला व स्टेट बँक आॅफ इंडियाच्या व्यवस्थापकाला कोरोनाची लागण झाल्याचे प्राप्त अहवालातून स्पष्ट झाले आहे.

रोह्यात बाधितांचा आकडा २०२ वर
रोहा : तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ कायम असून, सोमवारी सात तर मंगळवार ७ जुलै रोजी पुन्हा तालुक्यात १७ जणांचे नमुने कोरोनाचे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या आता २०२ वर पोहोचली आहे. यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
रोहा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दोन दिवसांत पुन्हा तालुक्यात कोरोनाचे २४ नवे कोरोना बाधित वाढले असून, त्यामध्ये १२ महिलांचा समावेश आहे. रोहा शहरातील दत्तमहिमा अपार्टमेंट ५, अंधार आळी १, रूप निवास खंडोबा मंदिराजवळ २, पारिजात रायकर पार्क ४, धावीर कृपा २, बालकृष्ण कॉम्प्लेक्स १ असे एकूण १५ रुग्ण बाधित झाले आहेत. वरसे ५, नागोठणे २, आरे बुद्रुक १ तर वाघेश्वरनगर रोठ येथील १ असे २४ रुग्ण आहेत. रोहा तालुक्यातील २०२ बाधितांपैकी ९० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

Web Title: coronavirus : 17 new Corona Positive patient found in Mhasala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.