coronavirus: रत्नागिरीत अडकलेले २१ प्रवासी रायगडमध्ये दाखल, प्रवाशांच्या हातावर मारले होम क्वॉरंटाइनचे शिक्के 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 03:25 AM2020-05-10T03:25:00+5:302020-05-10T03:25:21+5:30

विविध तालुक्यांतील हे नागरिक ग्रुप बुकिंग (प्रासंगिक करार) करून आले आहेत. एसटी बसची सुविधा पाहिजे असल्यास आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

coronavirus: 21 passengers stranded in Ratnagiri arrive in Raigad, home quarantine stamps hit on passengers' hands | coronavirus: रत्नागिरीत अडकलेले २१ प्रवासी रायगडमध्ये दाखल, प्रवाशांच्या हातावर मारले होम क्वॉरंटाइनचे शिक्के 

coronavirus: रत्नागिरीत अडकलेले २१ प्रवासी रायगडमध्ये दाखल, प्रवाशांच्या हातावर मारले होम क्वॉरंटाइनचे शिक्के 

googlenewsNext

- आविष्कार देसाई 
अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील २१ नागरिकांना घेऊन एसटी महामंडळाची बस शुक्रवारी सायंकाळी दाखल झाली. त्यामध्ये मुरुड, रोहा, अलिबाग, पेण, खालापूर आणि पनवेल येथे नागरिकांचा समावेश होता. त्या त्या तालुक्यातील प्रवाशांना सोडल्यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यावर त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाइनचे शिक्के मारण्यात आले.
विविध तालुक्यांतील हे नागरिक ग्रुप बुकिंग (प्रासंगिक करार) करून आले आहेत. एसटी बसची सुविधा पाहिजे असल्यास आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
राज्याच्या विविध भागात नोकरी, शिक्षण तसेच कामानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी सरकारने काही अटी, शर्तीवर परवानगी दिली आहे. अशा नागरिकांची वाहतूक करणेबाबत सरकारने काही मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रतिकिलोमीटरकरिता ४४ रुपये अधिक प्रतिबसमागे ५० रुपये अपघात साहाय्यता निधी घेण्यात येणार आहे.
बसेस आरक्षित करताना प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सरकारने विहित केलेल्या प्रवासास अनुमती देण्यात आल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधणकारक केले आहे. प्रवाशाने ओळखपत्र अथवा आधारकार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांना बसच्या प्रवास मार्गाने सुरुवातीचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण अशाच प्रवासास परवानगी आहे. मार्गातील मधल्या थांब्यावर थांबता येणार नाही. प्रवाशांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. बसेस लॉकडाउन पुरत्याच मर्यादित असल्याचे रायगड राज्य परिवहन विभागाच्या नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले.

सध्या एसटीची सेवा बंद आहे; परंतु विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना घरी जाता यावे, यासाठी एसटी महामंडळाने सेवा देण्याचे ठरवले आहे. प्रासंगिक करार करताना प्रतिकिमी ५६ रुपये आकारले जात होते. आता तोच दर ४४ रुपये आहे, म्हणजेच सध्या एसटीकडून १२ रुपयांची सूट नागरिकांना देण्यात येत आहे. त्यामुळे एसटीकडून लूट सुरू असल्याची ओरड खोटी असल्याचेही बारटक्के यांनी स्पष्ट केले.

उरणमधून १७० ओडिसा मजुरांची रवानगी
उरण : उरणमध्ये लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या १७० ओडिसा मजुरांची रवानगी शनिवारी बसमधून पनवेलकडे करण्यात आली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनवरून संध्याकाळी सुटणाºया रेल्वेने हे मजूर ओडिसाला रवाना होणार आहेत. याआधीही उरणमधून दोन दिवसांपूर्वी बिहार राज्यातील १०० तर उत्तर प्रदेशातील २४४ मजुरांना त्यांच्या राज्यात रवाना करण्यात आले असल्याची माहिती उरण वपोनि जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात प्रवाशांची तपासणी
शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यातून २१ प्रवाशांना घेऊन एसटी महामंडळाची एक बस आली. सर्व प्रवाशांची तपासणी करण्यासाठी त्यांना अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाइनचे शिक्के मारण्यात आले. त्यांना १४ दिवस घरातच थांबावे लागणार आहे. सदरच्या बसमध्ये पनवेल आणि मुरुड तालुक्यातील प्रत्येकी सात रोहा-चार, खालापूर, पेण, अलिबागमधील प्रत्येकी एक अशा २१ प्रवाशांचा समावेश होता. प्रवशांचा ज्या ठिकाणी उतरायचे होते. त्या तालुक्यातील वैद्यकीय अधिकाºयांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारण्यात आला असल्याची माहिती अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: coronavirus: 21 passengers stranded in Ratnagiri arrive in Raigad, home quarantine stamps hit on passengers' hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.