शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

coronavirus: रत्नागिरीत अडकलेले २१ प्रवासी रायगडमध्ये दाखल, प्रवाशांच्या हातावर मारले होम क्वॉरंटाइनचे शिक्के 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 3:25 AM

विविध तालुक्यांतील हे नागरिक ग्रुप बुकिंग (प्रासंगिक करार) करून आले आहेत. एसटी बसची सुविधा पाहिजे असल्यास आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

- आविष्कार देसाई अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील २१ नागरिकांना घेऊन एसटी महामंडळाची बस शुक्रवारी सायंकाळी दाखल झाली. त्यामध्ये मुरुड, रोहा, अलिबाग, पेण, खालापूर आणि पनवेल येथे नागरिकांचा समावेश होता. त्या त्या तालुक्यातील प्रवाशांना सोडल्यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यावर त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाइनचे शिक्के मारण्यात आले.विविध तालुक्यांतील हे नागरिक ग्रुप बुकिंग (प्रासंगिक करार) करून आले आहेत. एसटी बसची सुविधा पाहिजे असल्यास आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.राज्याच्या विविध भागात नोकरी, शिक्षण तसेच कामानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी सरकारने काही अटी, शर्तीवर परवानगी दिली आहे. अशा नागरिकांची वाहतूक करणेबाबत सरकारने काही मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रतिकिलोमीटरकरिता ४४ रुपये अधिक प्रतिबसमागे ५० रुपये अपघात साहाय्यता निधी घेण्यात येणार आहे.बसेस आरक्षित करताना प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सरकारने विहित केलेल्या प्रवासास अनुमती देण्यात आल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधणकारक केले आहे. प्रवाशाने ओळखपत्र अथवा आधारकार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांना बसच्या प्रवास मार्गाने सुरुवातीचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण अशाच प्रवासास परवानगी आहे. मार्गातील मधल्या थांब्यावर थांबता येणार नाही. प्रवाशांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. बसेस लॉकडाउन पुरत्याच मर्यादित असल्याचे रायगड राज्य परिवहन विभागाच्या नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले.सध्या एसटीची सेवा बंद आहे; परंतु विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना घरी जाता यावे, यासाठी एसटी महामंडळाने सेवा देण्याचे ठरवले आहे. प्रासंगिक करार करताना प्रतिकिमी ५६ रुपये आकारले जात होते. आता तोच दर ४४ रुपये आहे, म्हणजेच सध्या एसटीकडून १२ रुपयांची सूट नागरिकांना देण्यात येत आहे. त्यामुळे एसटीकडून लूट सुरू असल्याची ओरड खोटी असल्याचेही बारटक्के यांनी स्पष्ट केले.उरणमधून १७० ओडिसा मजुरांची रवानगीउरण : उरणमध्ये लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या १७० ओडिसा मजुरांची रवानगी शनिवारी बसमधून पनवेलकडे करण्यात आली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनवरून संध्याकाळी सुटणाºया रेल्वेने हे मजूर ओडिसाला रवाना होणार आहेत. याआधीही उरणमधून दोन दिवसांपूर्वी बिहार राज्यातील १०० तर उत्तर प्रदेशातील २४४ मजुरांना त्यांच्या राज्यात रवाना करण्यात आले असल्याची माहिती उरण वपोनि जगदीश कुलकर्णी यांनी दिली.जिल्हा रुग्णालयात प्रवाशांची तपासणीशुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यातून २१ प्रवाशांना घेऊन एसटी महामंडळाची एक बस आली. सर्व प्रवाशांची तपासणी करण्यासाठी त्यांना अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाइनचे शिक्के मारण्यात आले. त्यांना १४ दिवस घरातच थांबावे लागणार आहे. सदरच्या बसमध्ये पनवेल आणि मुरुड तालुक्यातील प्रत्येकी सात रोहा-चार, खालापूर, पेण, अलिबागमधील प्रत्येकी एक अशा २१ प्रवाशांचा समावेश होता. प्रवशांचा ज्या ठिकाणी उतरायचे होते. त्या तालुक्यातील वैद्यकीय अधिकाºयांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारण्यात आला असल्याची माहिती अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Raigadरायगडcorona virusकोरोना वायरस बातम्या