अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ३२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीतांची संख्या ४६१ वर पोचली आहे.कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा पनवेल पालिका क्षेत्रात झाला आहे. या ठिकणी २३४ बाधीत सापडले. तर, ग्रामीणमध्ये ९३ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये पनवेल पालिका हद्दीत १५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर आतापर्यंत तेथे २३४ रुग्णांची संख्या झाली आहे. उरण तालुका ३ (१०८), पनवेल ग्रामीण १२ (९३), मुरुड १, माणगाव १, श्रीवर्धन५, कर्जत ४, पोलादपूर २, खालापूर ३, महाड ४, अलिबाग ४, तळा १, पेण १ अशी एकूण ४६१ बाधीत आढळले आहेत. आतापर्यंत १७ जण दगावले आहेत. तर १३१ जण बरे झाले आहेत. तर, ३१३ जणांवर उपचार सुरू आहेत.माणगाव तालुक्यात पहिला रुग्णमाणगाव तालुक्यातील गोरेगाव विभागात पहिला पॉझिटिव्ह रूग्ण सापडला आहे. १२ मे रोजी गोरेगाव शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुशेडे या गावात काही तरूण मुंबई येथून आले होते. त्यापैकी २२ वर्षीय तरुणाला ताप असल्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर लगेचच पनवेल येथील कोवीड रूग्णालयात पाठविण्यात आले. तपासणीअंती त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
coronavirus: रायगड जिल्ह्यात २४ तासांत आढळले ३२ नवे रुग्ण, पनवेल पालिका क्षेत्रात १५ जणांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:02 AM