अलिबाग : अलिबाग तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे ३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अलिबाग शहर, वरसोली, गोंधळपाडा, चौल, चेंढरे, चोंढी, पोयनाड, लोणारे, रामराज, धेरंड, आंबेपूर, कुर्डूस, वरसोली, विद्यानगर, शहाबाज, शहापूर, बोडणी येथील रुग्णांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश रुग्णांना स्थानिक संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे. या नवीन रुग्णांमुळे तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या २८२ झाली आहे.वरसोलीतील ओम्कार फ्रेण्ड्स सर्कलजवळ राहणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गोंधळपाडा येथे १५ वर्षीय मुलाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. चेंढरे शिवाजीनगर येथील २३ वर्षीय तरुण आणि ४७ वर्षीय व्यक्तीला, चोंढी नाका येथे ३५ वर्षीय व्यक्तीला, अलिबाग शहरातील महावीर चौक येथील अथर्व सोसायटीतील २३ वर्षीय तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.वैभवनगर-अलिबाग येथील ४१ वर्षीय महिला, पोयनाड येथील ३२ वर्षीय तरु ण, लोणारे येथील ३० वर्षीय तरुण, रामराज येथील ३४ वर्षीय व्यक्ती, धेरंड येथील ६६ वर्षीय वृद्ध व्यक्ती, २६ वर्षीय महिला आणि ३६ वर्षीय पुरुष अशा तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. आंबेपूर येथील ५५ वर्षीय व्यक्तीला, चेंढरेतील स्वामी समर्थ नगर येथील २२ वर्षीय तरु णाला व ५१ वर्षीय व्यक्तीला, कुर्डूस येथील ३२ वर्षीय तरुणाला कोरोना झाला आहे. अलिबाग शहरातील सिद्धार्थ नगर येथे दोन रुग्ण आढळले आहेत. येथील एका ५० वर्षीय पुुरुषाला आणि ४५ वर्षीय महिलेला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला अहे.वरसोली कोळीवाड्यात गुरुवारी पुन्हा तीन रुग्णांची नोंद झाली आहे. येथील ५४ वर्षीय व्यक्ती, २२ आणि १९ वर्षीय तरुण अशा तिघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अलिबाग कोळीवाड्यातही तीन रुग्ण आढळले आहेत. येथील ३५ आणि ५५ वर्षीय अशा दोन पुरुषांना आणि ४६ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. अलिबाग शहरातील वैद्यबाग-कामत आळी येथील ३९ वर्षीय महिला आणि ३८ वर्षीय पुरुष अशा दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.अलिबागमधील शास्त्रीनगर- कोळीवाडा येथील २५ वर्षीय तरुण, विद्यानगर येथील २२ वर्षीय तरुणाला, बोडणी येथील ४७ वर्षीय व्यक्तीला, शहाबाज येथे ७२ वर्षीय वृद्धाला, शहापूर येथील ५२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर चौल येथेही एका ३२ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे.ं१६४ जणांवर उपचार सुरूआंबेपूर येथील २, वेलवली येथील १ असे तीन रु ग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी सापडलेल्या ३३ नवीनरु ग्णांमुळे तालुक्यात बाधितरु ग्णांची संख्या २८२ झाली आहे. यापैकी ८ रु ग्णांचा मृत्यू झाला असून, ११० रु ग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्य:स्थितीत १६४ पॉझिटिव्हरु ग्णांवर उपचार सुरू आहेत.
coronavirus: अलिबागमध्ये ३३ जण पॉझिटिव्ह, कोरोनाबाधितांची संख्या २८२ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:14 AM