coronavirus: रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे १६८ तासांत ३७ बळी, आतापर्यंत १७१ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 11:51 PM2020-07-08T23:51:26+5:302020-07-08T23:51:53+5:30
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज तीनअंकी संख्येने वाढते आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ७ जुलै अखेर ५ हजार ८३४ वर गेली आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १६८ तासांत कोरोनाने ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २ ते ७ जुलै या कालावधीत हे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. यापैकी १४ मृत्यू हे पनवेल तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १७१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज तीनअंकी संख्येने वाढते आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ७ जुलै अखेर ५ हजार ८३४ वर गेली आहे. यापैकी ३ हजार ३०४ रुग्ण बरे झालेत. २ हजार ३५९ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १७१ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५७ टक्के आहे.
चिंतानजक बाब म्हणजे, जुलै महिना सुरू झाल्यापासून गेल्या सहा दिवसांत ३७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. २ ते ७ जुलैदरम्यान हे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.
आठवडाभराची आकडेवारी
१ जुलै रोजी एकही मृत्यू झाला नव्हता. २ जुलै ६ रु ग्ण दगावले होते. ३ जुलै ४ तर ४ जुलै रोजी ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ५ जुलै रोजी ५ जणांचा कोरोनाने बळी घेतला. तर ६ जुलै रोजी १२ जणांचा मृत्यू झाला. ७ जुलै रोजी ५ जणांची कोरोनाविरु द्धची लढाई अपयशी ठरली.