शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

Coronavirus: लॉकडाउनमुळे अडकले ४१ हजार स्थलांतरित मजूर; स्वच्छतागृहाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 1:55 AM

कम्युनिटी किचनमधून जेवणाची सोय

आविष्कार देसार्ई 

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने उद्योग सुरू आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध प्रस्तावित प्रकल्पांचे काम सुरू आहे. एवढ्या मोठ्या संख्येने डेव्हलपमेंट सुरू असल्यामुळे हाताला काम नसण्याचा प्रश्नच येत नाही. याच कारणासाठी विविध राज्यांतील कामगार, मजूर लाखोंच्या संख्येने या ठिकाणी रोजगारासाठी आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउनमुळे तब्बल ४१ हजार ९१ स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. प्रशासनाने कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यातील नऊ हजार मजुरांची खाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र निवारा शेडमध्ये राहणाऱ्यांच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.

राज्याच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबई-पुण्यातील नागरिक हे रायगड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. त्यातील काही कोरोनाबाधित असल्याने त्यांचा संसर्ग जिल्ह्यातील नागरिकांना झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा पनवेल महापालिका क्षेत्राला बसला आहे. या ठिकाणी ४ मेपर्यंत १०२ रुग्ण आढळले आहेत. तसेच पनवेल ग्रामीणमध्ये २४ आणि उर्वरित रायगड जिल्ह्यामध्ये २० असे एकूण १४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याच कारणांनी पनवेल तालुका रेड झोनमध्ये टाकण्यात आला आहे. परंतु रायगड जिल्हा आॅरेंज झोनमध्ये टाकण्यात आला आहे.

परराज्यातील ४१ हजार ९१ मजूर जिह्यात अडकून पडले आहेत. त्यांच्या हाताचे कामही गेले आहे आणि त्यांना त्यांच्या गावीदेखील जाता येत नाही. अशा सर्व स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्याचे काम रायगडच्या जिल्हा प्रशासनाने केले आहे. पनवेल तालुक्यातील तीन ठिकाणी ९९ स्थलांतरित मजुरांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली आहे. खालापूर, पेण येथे प्रत्येकी दोन ठिकाणी आणि पोलादपूर येथील एका ठिकाणी अशी मिळून १५४ मजुरांना निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने गैरसोय होत असल्याचे मनोज निषाद याने सांगितले.स्वयंसेवी संस्थांची मदतनऊ हजार नागरिकांच्या दररोजच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर ३२ हजार ९१ नागरिकांना अन्नधान्याची पाकिटे वाटण्यात आली आहेत. त्यामध्ये २३१ मेट्रिक टन धान्याचा समावेश आहे. सरकारी मदतीबरोबरच विविध कंपन्या, स्वयंसेवी संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. कोणत्याही मजुरांना आर्थिक मदत करण्यात आलेली नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाचे जिल्हा चिटणीस विशाल दौंडकर यांनी दिली.जिल्ह्याच्या ५२ ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी एक हजार ६९२ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे ठेवण्यात येत असलेल्यांची आरोग्याची नियमित तपासणी करण्यात येते, तर कोरोना पॉझिटिव्ह आढळणाºयांना तातडीने पनवेल येथील रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईतील विविध सरकारी रुग्णालयांत पाठवण्यात येत आहे.- डॉ. प्रमोद गवई, जिल्हाशल्य चिकित्सक, रायगड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस