coronavirus: रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ४३० नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 12:55 AM2020-07-11T00:55:00+5:302020-07-11T01:15:09+5:30

रायगडमध्ये बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ७४८ वर पोहोचली. त्यापैकी ३९०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

coronavirus: 430 new corona positive patients in Raigad district | coronavirus: रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ४३० नवे रुग्ण

coronavirus: रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ४३० नवे रुग्ण

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ४३० नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी अखेर बाधित रु ग्णांची संख्या ६ हजार ७४८ वर पोहोचली. त्यापैकी ३९०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शुक्रवारी पनवेल पालिका क्षेत्रात १८१, पनवेल ग्रामीणमध्ये ४५, उरण १८, अलिबाग ३०, कर्जत १४, पेण ५७, महाड १०, खालापूर ३८, माणगाव ८, रोहा २०, मुरुड ५, म्हसळा १, तळा २, पोलादपूर १ असे एकूण ४३० कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आले. तर पनवेल मनपा ९७, पनवेल ग्रामीण २८, उरण २०, खालापूर १२, पेण ९, अलिबाग २३, मुरुड १, माणगाव ६, तळा १, रोहा ९, श्रीवर्धन २, महाड ९ आणि पोलादपूर १ असे एकूण २१८ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. ११ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी ३,९०४ रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २,८४४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कर्जत तालुक्यात आणखी १४ रुग्ण वाढले, एका महिलेचा मृत्यू
कर्जत : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरत असून शुक्रवारी आणखी १४ जण पॉझिटिव्ह आढळले. यात माजी नगरसेवक व एका माजी सरपंचाचा सहभाग आहे. त्यातच शुक्रवारी महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यँत तालुक्यातील रुग्णांचा आकडा २२६ वर पोहोचला आहे. या कोरोनाबाधितांमध्ये केवळ एकच महिला आहे.

कर्जत शहरातील म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये काम करीत असलेल्या एका ५६ वर्षीय व्यक्तीची कोरोना टेस्ट २ जुलै रोजी पॉझिटिव्ह आली होती. शुक्रवारी त्याची ४५ वर्षीय पत्नी व १९ वर्षांच्या मुलगी पॉझिटिव्ह आली आहे. तर गुरुवारी कोतवालनगरमधील एका ५५ वर्षांच्या महिलेला बाधा झाली होती. त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मुद्रे बुद्रुक परिसरातील एका इमारतीत राहणाºया ५४ वर्षीय व्यक्तीच्या कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, ही व्यक्ती दररोज डोंबिवली येथे कामानिमित्त जात-येत असे.

वावळोली गावातील ३० आणि २७ वर्षीय युवकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तसेच दहिवली मधील एका ४५ वर्षांच्या व्यक्तीलाही बाधा झाली आहे. हे तिन्ही युवक स्थानिक आमदारांचे कामकाज सांभाळत आहेत. पोसरी गावातील ३७ वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आला आहे. हा तरुण उपसरपंच आहे. तोही स्थानिक आमदारांचा निकटचा कार्यकर्ता आहे. वर्णे गावातील एका ३१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असून, ती व्यक्ती एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आहे. तिघर धनगरवाड्यामधील २० व २१ वर्षांच्या तरुणांच्या कोरोना टेस्टचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. हे दोघेही एक मुंबईच्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या खालापूर तालुक्यातील बंगल्यावर नोकरी निमित्त जा-ये करीत होते. कर्जत नगरपरिषद हद्दीतील गुंडगे विभागातील एका ३६ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असून, ही व्यक्ती माजी स्वीकृत नगरसेवक होती. कर्जत शहरातील एका ३० वर्षांच्या तरुणाचा कोरोना टेस्टचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. हा तरुण रोज मुंबईकडे नोकरीसाठी जात असे. ग्रामीण भागात असलेल्या सालवड गावातील एका ३१ वर्षांच्या तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. नेरळ शहरातील एका ५२ वर्षांच्या व्यक्तीला बाधा झाली आहे.

तळा तालुक्यात दोघांना लागण : रायगड जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून, ग्रामीण भागातही पसरला आहे. या कोरोनाच्या संसर्गापासून एकही तालुका सुटलेला नाही. तळा तालुक्यात शुक्रवारी नव्याने दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तळा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला कोरोनाची बाधा झाली होती, त्यामुळे पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाºयाची पत्नी व आठ महिन्यांच्या बालकाची स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. त्यांचे अहवाल गुरुवारी उशिरा प्राप्त झाले असून, दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर माणगांव लोणेरे येथे कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील परीटआळी येथील वास्तव्यात असलेला परिसर दिलीप तळेकर यांच्या घरापासून संतोष तळेकर यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला असून, प्रशासन अधिक सक्रिय झाले आहे.


महाड तालुक्यात १० जण पॉझिटिव्ह
महाड : महाड शहरासह तालुक्यात कोरोनाचे दहा रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यातील एका व्यापाऱ्याचा शुक्रवारी त्याच्याच घरात मृत्यू झाला.
या व्यापाºयाचा स्वॅब दोन दिवसांपूर्वी तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याच्यावर घरीच उपचार सुरू होते. रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या खेरीज नवेनगर भागात राहणारा भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी आणि काकर तळे येथील एक व्यक्ती या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याखेरीज वरंध येथील ४, बिरवाडी येथील २, महाड एमआयडीसीमधील पिडीलाइट कॉलनीतील एक अशा अन्य सात जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले. सर्व रुग्णांवर महाड ग्रामीण रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

खालापूरमध्ये ३८ जणांना कोरोनाची लागण
खोपोली : खालापूर तालुक्यात शुक्रवारी नव्याने ३८ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता २५३ झाली आहे. आजपर्यंत ४६ जण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण १९७ जणांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.
शुक्रवारी तालुक्यामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त ३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून खालापूर ग्रामीणमध्ये २७ तर खोपोली नगरपालिका हद्दीमध्ये ११ जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Web Title: coronavirus: 430 new corona positive patients in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.