CoronaVirus: पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रायगडमधील कोरोना रुग्णांची संख्या ४२ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 03:11 AM2020-04-20T03:11:46+5:302020-04-20T03:14:13+5:30

पोलादपूरमधील महिलेचा मृत्यू; आतापर्यंत जिल्ह्यात दोन मृत्यू

CoronaVirus 5 persons reports came positive takes raigad patient toll to 42 | CoronaVirus: पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रायगडमधील कोरोना रुग्णांची संख्या ४२ वर

CoronaVirus: पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रायगडमधील कोरोना रुग्णांची संख्या ४२ वर

Next

अलिबाग/श्रीवर्धन/पोलादपूर : रायगड जिल्ह्यात रविवारी पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर शनिवारी रात्री पोलादपूरमधील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या दोन झाली आहे. त्यामुळे रायगडमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२ झाली आहे.

पोलादपूरला प्रभातनगर पश्चिम येथील वृध्द जोडप्यापैकी महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयामध्ये हलविले होते. त्या महिलेचा शनिवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या महाड, पोलादपूर मधील २६ जणांना होम क्वारंटाईन केले आहे.

रविवारी पनवेल ग्रामीणमधील विचुंबे गावतील एकाचा रूग्णांमध्ये सामावेश असून ती व्यक्ती परराज्यातून आलेली आहे. ते बीपीटीमध्ये कामाला होते. श्रीवर्धनमधील चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत. दोन दिवसापूर्वी श्रीवर्धनमध्ये रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या नातेवाईकांसह त्याच्या घराजवळ राहणाऱ्या २८ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. बाकी २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित व्यक्तींपैकी १० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते ते निगेटिव्ह आलेले आहेत. मात्र पुन्हा दुसऱ्यांदा रविवारी या १० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले तर त्यांना घरी पाठवण्यात येण्याबाबत डॉक्टर योग्य निर्णय घेतील.

श्रीवर्धनमधील जनतेने परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन कुणीही विनाकारण घराच्या बाहेर जाऊ नये तसेच कोणतेही मदत हवी असेल तर प्रशासन त्यास तत्काळ मदत करेल. मात्र जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे.
- अमित शेडगे, प्रांताधिकारी श्रीवर्धन

श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते येथील रुग्णाच्या घराच्या व्यक्तीने खाजगी रु ग्णालयात जाण्याऐवजी तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात संबधित व्यक्तीस दाखल केले असते तर आज त्यांच्या घरातील इतर व्यक्तींचे अहवार कोरोना पॉझिटीव्ह आले नसते. मात्र आज ही अनेक व्यक्ती श्रीवर्धनमध्ये आल्याचे सांगत नाहीत किंबहुना जाणीवपूर्वक माहिती प्रशासनापासून लपवून ठेवतात यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढू शकतो अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी दिली.

Web Title: CoronaVirus 5 persons reports came positive takes raigad patient toll to 42

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.