कर्जत - कर्जत तालुक्यातील कोरोनामुळे रुग्ण बाधित होण्याची संख्या दररोज सरासरी २० ने वाढत आहे. काल १९ तर आज २१ अशी ४० ने संख्या वाढली, तर कर्जत तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने ९०० चा आकडा पार केला आहे. आजपर्यंत तालुक्यात ९०४ कोरोना रुग्ण वाढले, तर ७३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कर्जत तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पालिका कर्मचारी, खासगी डॉक्टर, पोलीस अधिकारी यांना लागण झाली आहे.मागील दोन दिवसांत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४० ने वाढली आहे. गेली अनेक महिने कोरोना काळात काम करणारे ५५ वर्षांचे तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता सातत्याने तालुक्याच्या ग्रामीण भागाबरोबर कर्जत आणि माथेरान शहरातही रुग्ण आढळून येत आहेत. माथेरानमध्ये दोन दिवसांपूर्वी एकाच घरातील १४ व्यक्ती बाधित झाल्यानंतर आता त्या घराच्या मागील बाजूस असलेल्या एका तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वन ट्री हिल परिसरात राहणारी आणि पालिकेत काम करणारी तरुणी कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. माथेरानमध्ये रिगल नाका आणि श्रीराम मंदिर चौकातील, तसेच एक भाजी विक्रेता असे तीन व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत, तसेच इंदिरानगर भागातील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह बनला आहे.नेरळ ग्रामपंचायतमधील आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाला असून, नेरळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक यांच्यानंतर एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी हे कर्जत शहराजवळ असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत राहतात तेही पॉझिटिव्ह बनले आहेत. कोलीवली येथील वारकरी संप्रदायामधील ज्येष्ठ वारकरी यांना कोरोनाची लागण झाली असून, कर्जत शहरातील एक खासगी महिला डॉक्टर आणि त्यांचा मुलगा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्जत शहरातील कचेरी रोड, मुद्रे, नेमिनाथ सोसायटी, नाना मास्तरनगर, गुरुनगर, इंदिरानगर, बाजारपेठ आणि दहिवलीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून, कर्जत शहरातील दहिवली भागात असलेल्या आदिवासी वसतिगृहात राहणाºया दोन जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यातील शिंगढोळमध्ये दोन तर किरवली, भडवळ, तमनाथ, किरवली येथेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.कर्जत तालुक्यातील ही रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा काही दिवसात एक हजार पार करू शकतो.आजपर्यंत तालुक्यात ९०४ कोरोना रुग्ण वाढले, तर ७३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. लोकांनी अधिक का़ळजी घेतली तर कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होईल, असे सांगितले जात आहे.
coronavirus: कर्जत तालुक्यात रुग्णसंख्या ९००, बुधवारी २१ रुग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 12:51 AM