coronavirus: कर्जतमध्ये ९८ टक्के मास्कचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 12:15 AM2020-07-07T00:15:39+5:302020-07-07T00:18:11+5:30
कर्जत तालुक्यापुरत बोलायचे झाले तर कर्जत, नेरळ बाजारपेठेत आलेले ९०-९२ टक्के नागरिक मास्क लावून असतात, तर उरलेल्यांना गांभीर्य नसल्याने ते मास्क लावत नाहीत.
- विजय मांडे
कर्जत : शहरात नगरपरिषदेने मास्क न लावणाऱ्यांवर दंड आकारणीची मोहीम सुरू केली आणि सुमारे ९८ टक्के लोक मास्कचा वापर करत आहेत, तर उर्वरित दोन टक्के लोकांना त्याचे गांभीर्य समजत नाही. आम्हाला काहीच होणार नाही, या आविभार्वात ते वावरताना दिसतात. काही लोक ते लावायचा म्हणून लावतात, तसेच बाजारपेठेत फिरणाºया काही भिकाऱ्यांच्या तोंडाला मास्क किंवा फडके नसते. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा लढा देण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी त्यात कितपत यश येईल हे सांगता येणार नाही.
मास्क लावा, हात स्वच्छ धुवा, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करा, अशा सूचना नागरिकांना करायला लागतात. हे खरे दुर्दैव आहे. कर्जत तालुक्यापुरत बोलायचे झाले तर कर्जत, नेरळ बाजारपेठेत आलेले ९०-९२ टक्के नागरिक मास्क लावून असतात, तर उरलेल्यांना गांभीर्य नसल्याने ते मास्क लावत नाहीत. व्यापारी मंडळींचेही असेच आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी दिसले की, मास्क किंवा रुमाल बांधण्याची एकच घाई होते. भविष्यात मास्क हे आपल्या जीवनशैलीतील एक भाग बनणार आहे. एरव्ही आपण चैनीसाठी मागे - पुढे न पाहता, कितीही पैसे खर्च करीत असतो, परंतु चांगला मास्क घेण्यासाठी कंजुषी करतो. मास्क लावण्याच्या बंधनाने अनेकांना तंबाखू किंवा घुटका खाऊन थुंकता येत नाही.
चोरट्यांचे फावतेय
मास्कच्या वापरामुळे रबरी नाडीने कान दुखत असल्याच्या तक्रारी केल्या. मास्क लावलेला नातेवाईक किंवा मित्र असल्यास पटकन ओळखू न आल्याने पंचाईत होते. चोरट्यांना फायदा होऊन सीसीटीव्हीतही पोलीस ओळखू शकत नाहीत, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.