दासगाव : देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि लॉकडाउनमुळे राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागांमध्ये व्यवसाय आणि नोकरीनिमित्त वास्तव्याला असलेले नागरिक आता आपल्या घराकडे येऊ लागले आहेत. महाड तालुक्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत १२,५२४ नागरिकांचे आगमन झाले तर त्यानंतर १३ मेपर्यंत ९६६ नागरिकांचे आगमन झाले, असे एकू णतालुक्यांमध्ये १३ हजार ४९० नागरिकांचे आगमन झाले असल्याची नोंद महाड पंचायत समितीच्या ग्रामविकास विभागाकडे करण्यात आली आहे.महाड तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये गुजरात, राजस्थानसह मुंबई पुण्यामध्ये कामधंदा, नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हजारो कु टुंबे मुंबई-पुण्यामधून आरोग्याच्या सुरक्षितेसाठी आपल्या मूळगावी परत येत आहेत; परंतु आपल्याच गावामध्ये येण्यासाठी ग्रामस्थांना अनेक अडणींना सामोरे जावे लागत आहे.बाहेरून येणाºया नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यांची प्रथम आरोग्य तपासणी करून क्वारंटाइन करण्यात आले. आलेल्या नागरिकांची व्यवस्था पाहण्यासाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेविका, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पंचायतीचे सदस्य, लोकप्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने क्वारंटाइन नागरिकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करायची आहे. याबाबत तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.गावांत सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापनमहाड तालुक्यांमध्ये आतापर्यंत आलेल्या नागरिकांची संख्या १३,४९० असून, या सर्व नागरिकांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली असल्याचे ग्रामविस्तार अधिकारी वाघमोडे यांनी सांगितले. ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.गावांमध्ये आलेल्या नागरिकांची प्रथम आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. आलेल्या नागरिकांची व्यवस्था पाहण्यासाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
coronavirus: अडकलेल्या १३,४९० चाकरमान्यांचे महाड तालुक्यात आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 2:57 AM