शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

आदिवासींच्या जीवनशैलीमुळे कोरोना कोसो दूर; निसर्गाच्या सान्निध्यामुळे प्रतिकारशक्तीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:39 AM

पनवेल तालुक्यातील आदिवासी पाड्यावर रुग्ण नाही

अरूणकुमार मेहत्रे 

कळंबोली : कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे, परंतु पनवेल तालुक्यातील आदिवासींच्या जीवनशैलीने कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूला कोसो दूर ठेवल्याचे दिसून येत आहे. या आदिवासी पाड्यावर आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेले नाही.पनवेल महापालिका, तसेच ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘पुन:च्छ हरिओम’ झालेल्या परिसरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु पनवेल तालुक्यातील ८५ आदिवासी पाड्यांवर अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. कोरोलवाडी, घेरावाडी, बानूबायवाडी, लहूचीवाडी, आखाडावाडी, काशीमाळ, विठ्ठलवाडी, खैरातवाडी, भोकरवाडी, डुंगीचीवाडी, त्याचबरोबर माळडुंगी, वाजे, मोरबा, गरगळी, वारजोली, शेरोली, भेकरा, खारघर दामोळे, बेरले या परिसरातील आदिवासी पाड्यांवरील ४,१९६ कुटुंबे निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्य करतात. दररोज कठोर परिश्रम करतात. शेती, मोलमजुरी, रानभाज्या व लाकडाच्या मुळी विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवतात.

निसर्गाच्या सान्निध्यात वावरत असल्याने त्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. तीन महिन्यांपूर्वी कोरोना रोगाचा संसर्ग होऊ लागला, तेव्हा पनवेल परिसरासह तालुक्यात लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे आदिवासी पाड्यांवर उपासमारीचा सामना करावा लागला. शासनाकडूनही तत्काळ मदत मिळाली नाही. तेव्हा काही सामाजिक संस्थांनी आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप, मास्क, साबण, सॅनिटायझरबरोबर कोरोनाबाबत जनजागृती केली. पंचायत समिती, तसेच ग्रुप ग्रामपंचायत यांच्या माध्यमातूनही आजाराविषयी माहिती देण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता पाळणे, साबणाने हात धुणे, मास्क यांचे उपयोगही सांगितले.शहराशी संपर्क येऊनही आदिवासी खंबीरआदिवासी पाड्यांवरील नागरिक पनवेल बाजारपेठेत दररोज रोजंदारीवर काम करतात. रानभाज्या, लाकडाच्या मोळी विकणे, मोलमजुरी करणे आदींसाठी पनवेल शहरात प्रवेश करतात, परंतु आद्याप या वस्ती-वाड्यावर कोरोनाने शिरकाव केलेला नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घेणे, जीवनशैली चांगली राखणे अत्यंत महत्वाचे असल्याचे यावरून कळते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या