शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

CoronaVirus: लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या राजस्थानमधील 27 विद्यार्थ्यांना घेऊन बस रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 8:19 PM

- आविष्कार देसाई अलिबाग : राजस्थान येथील कोटामध्ये राज्यातील हजारो विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये अडकून पडले होते. त्या विद्याथ्र्याना आपापल्या घरी ...

- आविष्कार देसाई

अलिबाग : राजस्थान येथील कोटामध्ये राज्यातील हजारो विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये अडकून पडले होते. त्या विद्याथ्र्याना आपापल्या घरी परत यायचे होते. रायगड जिल्ह्यातील सुमारे 27 विद्यार्थ्याना घेऊन एक बस मंगळवारी राजस्थानमधून सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रवाना झाली आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खारघर येथे हि बस येणार असल्याची माहिती रायगडचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

राजस्थान येथील कोटा येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आयआयटी आणि मेडीकल अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी जातात. राज्यातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी तेथे गेले होते. परंतू कोरोनाच्या पाश्र्र्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने सर्वच विद्यार्थी तेथे अडकून पडले होते. अलिबागमधील श्रेया प्रदिप घरत हि विद्यार्थी शिक्षणानिमीत्त ती या ठिकाणी 2018 पासून राहते. रिझोनेन्स कोचींग इनस्टीटय़ुटमध्ये ती सध्या आयआयटीसाठी तयारी करत असल्याचे तीने लोकमतशी बोलताना सांगितले. कोरोनामुळे आम्ही सगळेच घाबरलो आहोत. घरच्यांपासून लांब असल्याने पालकांनाही चिंता लागणो स्वाभाविकच आहे. मात्र आता आम्ही आमच्या घरी निघाला आहोत. त्यामुळे आनंद होत असल्याचे श्रेयाने सांगितले.सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अॅलेन साकार ग्राऊँडमधून बस निघाली आहे. राजस्थान सरकारच्या बस असल्या तरी त्याचे पैसे हे आपल्या सरकारने दिले आहेत. बसमध्ये एकूण 27 विद्यार्थी आणि पाच पालक आहेत. बसमध्ये बसण्याआधी सर्वाच्या आरोग्याची तपसणी करण्यात आली आहे, तसेच खारघरमध्ये आल्यावर देखील त्यांची तपासणी करण्यात येईल. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार त्यांना निरीक्षण कक्षात अथवा घरीच निरीक्षणाखाली 14 दिवस ठेवण्यात येणार आहे, असे शितोळे यांनी सांगितले.बसमधून येणा:यांची आवश्यकती सर्व काळजी घेण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याकडेही शितोळे यांनी लक्ष वेधले. खारघर येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बस पोचण्याची शक्यता आहे.दरम्यान, पनवेल-12, अलिबाग-4, पेण-3, खालापूर आणि कजर्त प्रत्येकी 2 मुरुड, महाड, सानपाडा आणि लोणावळा प्रत्येकी 1 असे एकूण 27 विद्यार्थी आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या