Coronavirus: परराज्यातील नागरिकांना मिळाला ‘रायगड ई-पास अ‍ॅप’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 01:15 AM2020-05-03T01:15:58+5:302020-05-03T01:16:10+5:30

संबंधित जिल्हाधिकाºयांकडून सहमती मिळाल्यानंतर मजुरांना वाहनाद्वारे मूळ निवासाच्या ठिकाणी पाससह पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Coronavirus: Citizens of foreign countries get support of 'Raigad e-pass app' | Coronavirus: परराज्यातील नागरिकांना मिळाला ‘रायगड ई-पास अ‍ॅप’चा आधार

Coronavirus: परराज्यातील नागरिकांना मिळाला ‘रायगड ई-पास अ‍ॅप’चा आधार

Next

अलिबाग : लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित केले आहे.

रायगड जिल्ह्यातून परराज्यामध्ये जाऊ इच्छिणाºया कामगार/पर्यटक/भाविक/ विद्यार्थी व इतर व्यक्तींनी त्यांच्या राज्यामध्ये जाण्याकरिता निश्चित कार्यपद्धती अवलंबविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामध्ये सध्या विविध कॅम्पमध्ये जे मजूर आहेत, त्याबाबत ते ज्या राज्यातील निवासी आहेत, अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मजूरांच्या यादीसह संपर्क साधून सहमती
घेण्यात येणार आहे. संबंधित जिल्हाधिकाºयांकडून सहमती मिळाल्यानंतर मजुरांना वाहनाद्वारे मूळ निवासाच्या ठिकाणी पाससह पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

इतर राज्यातील व्यक्ती ज्या रायगड जिल्ह्यात अडकून पडल्या असतील व त्यांना मूळ गावी वास्तव्याच्या जिल्ह्यात जायचे असल्यास अशा व्यक्तीच्या नावासह तसेच वाहनाचा प्रकार व क्रमांक या बाबी नमूद करून रायगड जिल्ह्यातील ‘रायगड ई- पास’वर अ‍ॅपवर अर्ज करावा. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातून बाहेर राज्यामध्ये जाणाºया व्यक्तींनाही या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. रायगड जिल्ह्यातून बाहेर राज्यामध्ये जाणाºया कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी वाहतूक/प्रवास करण्यासाठी वरील गुगल लिंकमध्ये माहिती भरल्यानंतर तसेच रायगड ई-पास अ‍ॅपद्वारे अर्ज केल्यानंतर परराज्यात जाऊ इच्छिणाºयांसाठी जिल्हा प्रशासनाकडूनरविवार, ३ मे २०२० पासून परवानगी देण्यास सुरुवात केली जाणार आहे.

प्रवास करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने ते सध्या जेथे राहत आहेत, तेथील प्राथमिक आरोग्यकेंद्र / ग्रामीण रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय / जिल्हा रुग्णालय किंवा नोंदणीकृत खासगी दवाखाना येथे संपर्क साधून संबंधित डॉक्टरकडून स्वत:ची तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र
उपलब्ध करून घेणे बंधनकारक राहील व ते वैद्यकीय प्रमाणपत्र प्रवासादरम्यान स्वत:सोबत बाळगणे तसेच स्वत:स १४ दिवस गृह विलगीकरण (होम क्वॉरंटाइन) करून घेणे बंधनकारक असणार आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये परराज्यातील जे मजूर अथवा व्यक्ती अडकल्या आहेत, अशा व्यक्तींनी त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या मूळ निवासाच्या इच्छित स्थळी जाण्याकरिता जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्याप्रमाणे कार्यवाही करावी व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

Web Title: Coronavirus: Citizens of foreign countries get support of 'Raigad e-pass app'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.