coronavirus: रायगडमधील कोरोनाबाधितांवर जिल्ह्यातच होणार उपचार, मुंबईची क्षमता संपली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 02:47 AM2020-05-15T02:47:18+5:302020-05-15T02:47:24+5:30

जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यात सापडलेल्या रुग्णांवर पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार केले जात होते. मात्र, त्यांची क्षमता संपल्याने रायगड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्येच कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत.

coronavirus: Corona patient in Raigad will be treated in the district itself, Mumbai's capacity is exhausted | coronavirus: रायगडमधील कोरोनाबाधितांवर जिल्ह्यातच होणार उपचार, मुंबईची क्षमता संपली

coronavirus: रायगडमधील कोरोनाबाधितांवर जिल्ह्यातच होणार उपचार, मुंबईची क्षमता संपली

Next

 - आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण सापडत आहेत. सुरुवातीला जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यात सापडलेल्या रुग्णांवर पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार केले जात होते. मात्र, त्यांची क्षमता संपल्याने रायगड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्येच कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचा दावा केला जात आहे. अपुरे मनुुष्यबळ आणि साधनांची कमतरता यावरच प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाचीदेखील झोप उडाली आहे. त्यातच आता मुंबई-ठाणे या विभागातील नागरिक मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्याच्या विविध भागात येत आहेत. सुमारे दीड लाखाहून अधिक नागरिक येण्याची शक्यता आहे. याआधीच सुमारे एक लाख ३५ हजारांहून अधिक नागरिक दाखल झाले आहेत.
तिसºया टप्प्यातील लॉकडाउन संपून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात होण्याला तीनच दिवसांचा अवधी उरला आहे. याच कालावधीमध्ये मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यातील नागरिकांनी आता पुन्हा रायगडची वाट धरली आहे. रेड झोन, कोरोनाबाधित क्षेत्रातून हे नागरिक येत असल्याने जिल्ह्यामध्ये धोका वाढला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.
सुरुवातीला जिल्ह्यातील रुग्णांवर पनवेल, नवी मुंबई, मुंबई परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत होते. मात्र, तेथील स्थानिक पातळीवरील रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने अन्य जिल्ह्यातील येणाºया रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार करणे कठीण जाणार आहे. कारण या रुग्णालयांची खाटांची संख्या संपली असल्याने रायगड जिल्ह्यातील रुग्णांवर जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार आहे. याची सुरुवात बुधवारी रात्रीपासूनच करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत अलिबागच्या सरकारी रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दोन रुग्णांवर उपचार करण्यात येत होते.
प्रशासन सतर्क झाले आहे. रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी सर्व सरकारी रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या आहेत.

सरकारी रु ग्णालयांत
९० डॉक्टर कार्यरत
अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये २० आणि होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये (जिजामाता रुग्णालय) ७० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. १० हजार ६५७ पीपीई किट उपलब्ध आहेत. १० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. जिल्ह्यात सरकारी ९० डॉक्टर आहेत.
डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी खासगी व्यवसाय करणाºया डॉक्टरांनाही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिली. व्हेंटिलेटरची संख्या कमी असली तरी खासगी रुग्णालयाकडून घेण्यात येणार आहेत. १०० मध्ये एका रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक आरोग्यकेंद्रातील नर्स, डॉक्टर आणि वॉर्डबॉय यांनाही आता पीपीई किट द्यावे, अशी मागणी जिल्ह्यात जोर धरत आहे. कारण बाहेरून नागरिक हे गावागावांमध्ये आलेले आहेत. त्यामुळे कसलाही त्रास जाणवल्यास त्यांना सुरुवातीला प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्येच जावे लागणार असल्याने तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना धोका पोहोचू शकतो.

अलिबाग शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या ठिकाणी जिल्ह्याच्या विविध भागांतून नागरिक सातत्याने येत असतात. सुरुवातीला शहरांची नाकाबंदी करण्यात आली होती. जिल्हा आॅरेंज झोनमध्ये असल्याने काही अटी, शर्ती शिथिल करण्यात आल्या. मात्र, या कालावधीत रेडझोनमधून मोठ्या संख्येने नागरिक दाखल होत असल्याने सर्तक राहावे लागणार आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, हात सातत्याने साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा, तोंडाला मास्क लावावे, लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांची काळजी घ्यावी.
-प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबाग
 

Web Title: coronavirus: Corona patient in Raigad will be treated in the district itself, Mumbai's capacity is exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.