म्हसळा : माणगाव येथील साई येथे सेवेत रुजू असणाºया म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथील एका आरोग्यसेवेतील कर्मचाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या कर्मचाºयाला योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोपही आता होत आहे.२ जुलै रोजी साई प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाºया एका फार्मसिस्ट कर्मचा-याला लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. हा कर्मचारी सेवेसाठी जरी माणगाव तालुक्यातील साई येथे जात असला, तरी त्याचे गाव हे म्हसळा तालुक्यातील गोंडघर आहे. हा कर्मचारी रोज गोंडघर ते साई असे ये-जा करत असून, आरोग्यसेवा देताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या रुग्णाचा म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक यांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप शेकापचे तालुका चिटणीस तथा गोंडघर येथील ग्रामस्थ संतोष पाटील यांनी केला आहे.तर म्हसळा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे हे मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या विमा संरक्षणाचे ५० लाख रुपये हे पीडित कुटुंबाला तत्काळ मदत म्हणून द्यावे, अशी मागणी संतोष पाटील यांनी केली.
coronavirus: आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 1:46 AM