शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

coronavirus: श्रीवर्धन तालुक्याला कोरोनाचा विळाखा, बाधितांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 1:19 AM

आजपर्यंत श्रीवर्धन प्रशासनाकडून १२९ लोकांचे स्वाब चाचणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. २९ व्यक्ती कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून आठ व्यक्ती उपचार घेऊन स्वगृही परतले आहेत

श्रीवर्धन : चक्रीवादळाने ग्रासलेल्या लोकांनी एक महिना कोरोनाकडे दुर्लक्ष केले. परिणाम स्वरूप श्रीवर्धन शहरात दोन दिवसात पंधरा नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.श्रीवर्धनमध्ये पहिला बाधित रुग्ण हा मुंबईतील वरळी येथून आला. त्यानंतर सर्वप्रथम त्याच्या घरातील इतर लोकांना बाधा झाली. मात्र त्यानंतर जवळपास दीड महिना एकही नवीन रुग्ण श्रीवर्धन तालुक्यामध्ये आढळला नाही. तीन जूनला चक्रीवादळ झाले. या चक्रीवादळाने सबंध श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना कोरोनाचा विसर पडला होता. चक्रीवादळाच्या बरोबर एका महिन्यानंतर श्रीवर्धन तालुक्यातील विविध भागातील दोन वैद्यकीय व्यवसायिकांना कोरोनाची बाधा झाली, त्यानंतर मात्र श्रीवर्धन शहरात दोनच दिवसात नवीन १५ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. आजमितीस श्रीवर्धन तालुक्यात २९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.आजपर्यंत श्रीवर्धन प्रशासनाकडून १२९ लोकांचे स्वाब चाचणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. २९ व्यक्ती कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून आठ व्यक्ती उपचार घेऊन स्वगृही परतले आहेत, उर्वरीत १९ जणांवर माणगाव, अलिबाग, पनवेल याठिकाणी उपचार चालू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे बघून शहरातील व्यापाऱ्यांनी चार दिवसासाठी श्रीवर्धनमधील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीवर्धन शहरातील व्यापाºयाने स्वत:हून चार दिवसासाठी सर्व व्यवहार बंद केले असले तरीसुद्धा कोरोनावरती प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आॅनलाइन मागणीनुसार किराणा व इतर बाबी ग्राहकांना घरपोच केल्यास आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास निश्चितच परिणामकारक ठरेल असे वाटते. कारण किराणामाल, भाजीपाला, कापड दुकान तसेच पावसाळा ऋतुमध्ये लागणाºया आवश्यक बाबी त्या दुकानासमोर ग्राहक सोशल डिस्टन्स पाळत नसतानाचे दिसून येतात. त्या कारणास्तव संबंधित व्यापाºयास कोरोनाची बाधा होण्याचा संभव वाढलेला आहे. व्यापाºयाने स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आॅनलाईन विक्रीस प्राधान्य दिल्यास निश्चितच परिणामकारक ठरणार आहे. रविवारी शहरातील मुख्य चौकांमध्ये सर्वत्र निरव शांतता पसरल्याची निदर्शनास आली. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. आगामी काळात सोशल डिस्टन्स पाळला न गेल्यास कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माणझाली आहे.चक्रीवादळामुळे वाढचक्रीवादळाने खºया अर्थाने श्रीवर्धनमध्ये कोरोना पसरविण्यास कारणीभूत ठरले आहे. कारण वादळानंतर स्वयंमसेवी संस्थेकडून येणाºया मदतनिधीसाठी व मदत निधीच्या अफवांमुळे अनेक लोकांच्या झुंडीच्या झुंडी श्रीवर्धन नगरपरिषद व तहसील कार्यालयकडे जात असताना निदर्शनास आले आहेत. अनेक महिला आम्हाला मदत मिळाली नाही, आम्हालाही जीवनावश्यक वस्तूंच्या किट द्या, अशा मागणीसाठी प्रशासकीय कार्यालयांकडे जात आहेत. परिणाम स्वरूप कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.अलिबागमध्ये आढळले कोरोनाचे सहा नवे रुग्णअलिबाग : अलिबाग तालुक्यात सहा नवे कोरोना संसर्गित रुग्ण आढळले असले, तरी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे रविवारी १० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने चाचणी केलेल्या रु ग्णांमध्ये रविवारी ६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यात स्वामी समर्थनगर, पिंपळभाट येथील ५३ वर्षीय पुरुष, कुरु ळ आरसीएफ कॉलनी येथील एक ३२ वर्षीय पुरुष, कावीर-बोरपाडा येथील ३१ वर्षीय पुरुष, धेरंड येथील ३५ वर्षीय पुरुष, कुसुंबळे-सरस्वती बाग येथील ३५ वर्षीय पुरु ष या सहा जणांची तपासणी केल्यानंतर स्वॅब टेस्टिंगमध्ये ते पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रविवारी दिवसभरात १० रुग्णांना घरी सोडण्यात आले. यात चरी येथील तीन, चौल-कोळीवाडा, वरसोली, विद्यानगर, आंबेपूर, मोठे शहापूर तेच शहरातील सिद्धार्थनगर, तसेच मांडवी मोहल्ला येथील कोरोनामुक्त रुग्णांचा समावेश आहे.दरम्यान, तालुक्यात रविवारी आढळलेल्या सहा कोरोनाबाधित रुग्णांमुळे एकूण रुग्ण संख्या १७९ वर पोहोचली आहे. यापैकी आठ रु ग्णांचा मृत्यू झाला असून, ९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत ७३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.१० रुग्णांना सोडले घरीरविवारी दिवसभरात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे १० रुग्णांचे अंतिम रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्या रुग्णांना घरी सोडण्यात आले. यात चरी येथील तीन, चौल-कोळीवाडा, वरसोली, विद्यानगर, आंबेपुर, मोठे शहापूर तेच शहरातील सिद्धार्थनगर, तसेच मांडवी मोहल्ला येथील कोरोनामुक्त रु ग्णांचा समावेश आहे.दोन बाधितांमुळे कर्जतमध्ये १६४ रुग्णकर्जत : तालुक्यात रविवारी नेरळ गावातील आणखी एका व्यापाºयाला कोरोनाची लागण झाली असून, त्या व्यापाºयाचा मोठा भाऊ यापूर्वी कोरोनाग्रस्त आहे. त्या व्यापाऱ्यांची आई आणि उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला कोरोना झाला आहे. कर्जत शहारात रविवारी आणखी दोन नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १६४ वर पोहोचली आहे.नेरळ गावातील बाजारपेठेमध्ये दुकान असलेल्या ५१ वर्षीय व्यापारी पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांच्या सोबत त्यांचे ४२ वर्षीय भाऊ आणि त्यांची ७१ वर्षीय आई यांना संसर्ग झाला आहे. व्यापारी आणि त्यांच्या आईला कल्याण येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. कर्जत शहरातील गुंडगे भागातील बदलापूर येथे नोकरीसाठी जाणाºया ३४ वर्षीय तरुणीला संसर्ग झाला असून, शहरातील गुंडगे पंचशीलनगरातील रसायनी लोधिवली येथे नोकरीसाठी जाणाºया ३८ वर्षीय तरुणही कोरोनाबाधित झाला आहे.कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात ५ जुलै रोजी दोन नवीन रुग्ण आढळून आले असून, त्यात कर्जत- मुरबाड राज्यमार्ग रस्त्यावरील वारे गावातील ४५ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या तरुणाचा गावात गणपती मूर्ती बनविण्याचा कारखाना असून नातेवाइकांचा मृत्यू झाल्याने काही दिवसांपूर्वी त्याचे उत्तरकार्य होते आणि त्यानंतर त्याला लागण झाल्याची शक्यता आहे. सध्या तो बदलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर माणगावतर्फे वरेडी ग्रामपंचायतीमध्ये माणगाव हद्दीत असलेल्या एका वयोवृद्ध नागरिकांच्या आश्रमात राहणारी ७२ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह बनली आहे. स्थानिक ग्रामपंचायतच्या म्हणण्यानुसार ही महिला आजारी होती आणि त्या वृद्ध महिलेवर उपचार होत असताना, त्यांचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आजच्या नवीन रुग्णांमध्ये ग्रामीण भागातही रुग्ण आढळून आले आहेत. १६४ ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पाहता प्रशासन आणि आरोग्य विभागाला सतर्क होण्याची गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड