मधुकर ठाकूर
उरण : कोरोनाच्या शंभर दिवसांच्या लॉगडाऊन दरम्यान मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड विभागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखीनच घट्ट होत चालला आहे. पाच बंदरांमुळे जागतिक व्यापारी केंद्र बनलेल्या जेएनपीटी आणि उरण परिसरही वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कात्रीत सापडला आहे. जरा घराबाहेर पडलं तर आणि सामाजिक अंतर पाळले नाहीत तर काय होतंय ही उरणकरांची बेफिकीरपणाची वृत्तीच कोरोना महामारीचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव होण्यास कारणीभूत ठरु लागली आहे.या शंभर दिवसांच्या लाकडाऊन काळात केवळ सोशल गॅदरिंगचे पालन केले जात नसल्यानेच उरण परिसरात कोरोना रुग्णांची संख्या तीनशेच्या जवळपास पोहचली आहे.तर कोरोनाचा फटका येथील देशातील सर्वात मोठ्या आणि नंबर वन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेएनपीटी बंदरालाही बसला आहे. त्यानंतरही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उरणमध्ये अद्यापही सोय उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे वैद्यकीय सोयी सुविधांअभावी कोरोनाबाधीत रुग्णांना उपचारासाठी पनवेलमध्ये पाठविण्याची पाळी रायगड जिल्हा प्रशासनावर आली आहे.
रायगड जिल्ह्याच्या मुंबई, नवी मुंबई, पनवेलच्या प्रवेशद्वारावरुन कोरोनाचे हे वाढते संकट उरणच्या वेशीपर्यंत पोहोचले आहे.उरण परिसरातील जेएनपीटी, कोटनाका,मोरा,जासई विभागातुन कोरोना महामारीचे सुरू झालेले सत्र अद्यापही थांबण्यास तयार नाही. या कोरोनाच्या विळख्यात करंजा परिसरातील गावे सापडली आहेत.मयत झालेल्या एका इसमाच्या नातेवाईकांच्या सांत्वनासाठी शेकडो लोक गेले. मात्र नातेवाईकच कोरोनाग्रस्त निघाल्याने मात्र पाहता पाहता उरणमधील कोरोना रुग्णांचा आकडा दिडशेपार कधी पोहचला हे कळलंच नाही. करंजा परिसरातील कोरोना वाढत्या रुग्णांच्या हाहाकाराने जिल्हा प्रशासनालाही हादरुन सोडलं आहे. संचारबंदी, लॉगडाऊन मधील नियमांचे पालन करा आणि आपणच आपल्या कुटुंबियांसह सवार्चीच काळजी घेण्याचे आवाहन वारंवार शासकीय स्तरावरून करण्यात येत आहे.मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याने उरण, जेएनपीटी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. लॉगडाऊन दरम्यान शिथिलता देण्यात आल्यानंतर तर कोरोना नाहिसा झाल्याच्या आविभार्वात उरणमध्ये नागरिक वागु लागले आहेत. बाजारपेठ, मासळी मार्केट, भाजीपाला मंडईत खरेदीसाठी नागरिकांची दररोज गर्दी उसळते. उरण परिसरात कोरोना आता गावोगावी जाऊन पोहोचला आहे. आजतागायत उरण परिसरात कोरोनाचे रुग्ण २७२ रुग्ण सापडले आहेत. यापैकी २०९ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर ५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना हे जगावरचे संकट आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक मंदीचे सावट पसरले आहे. जागतिक मंदी आणि कोरोनाचा परिणाम जेएनपीटी बंदरातून आयात-निर्यात होणाºया व्यापारावर काही प्रमाणात झाला आहे. - जयंत ढवळे, वरिष्ठ प्रबंधक, जेएनपीटीवारंवार आवाहन करूनही संचारबंदी, लॉकडाऊनमधील नियमांचे पालन न करता नाहक गर्दी करणाºया नागरिकांमुळेच उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाकडून आवश्यकतेप्रमाणे खबरदारी घेतली जात आहे. अडकून पडलेल्या परराज्यातील सुमारे चार हजार मजुरांना त्यांच्या राज्यांत पाठविण्यात आले आहे. - भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरणउरण परिसरातील अनेक कंपन्या आणि कंटेनर गोदामांचे कामकाज संचारबंदी, लॉकडाऊनदरम्यान ठप्प झाले आहे. यामुळे हजारो कामगारांना रोजगारापासून मुकावे लागले आहे. वाहतूकदार, व्यापारी यांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. पर्यटन आधारित घारापुरी बेटही सुनसान झाले आहे. मुंबई - एलिफंटा आणि भाऊचा धक्का - मोरा या जलमार्गावर पर्यटक, प्रवासी वाहतूक करणाºया बोट सेवाही बंद पडली आहे.कठोर उपाययोजनाजेएनपीटीने बंदरात आढळून येणाºया कोरोना रुग्णांसाठी कामगार वस्तीतल्या ट्रामा सेंटरमध्ये १६ तर आॅफिसर्स क्लबमध्ये २० अशा ३६ बेड कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आल्याची माहिती जेएनपीटीचे सिनियर डेप्युटी सीएमओ राज हिंगोरानी यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोर्ट, कामगार वस्तीतल्या आणि कार्यालयाच्या इमारती व कामगारांची वाहतूक करणाºया बसेस दररोज सकाळ, संध्याकाळी दोन वेळा सॅनिटाईझिंग करण्यात येत आहेत. कंटेनर चालकांसाठी पार्किंग प्लाझा सेंटर मध्ये राहणे, खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेएनपीटीबाधीत गावांनाही थर्मल गन, निजंर्तुकीकरण केले जात आहे. फक्त सोशल गॅदरिंगमुळेच उरण जेएनपीटी परिसरात कोरानाचे रुग्ण वाढत चालले असल्याची माहितीही डॉ.हिंगोरानी यांनी दिली.१) जेएनपीटीसह इतर खासगी बंदरांमुळे उरणची ओळख देशाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून होऊ लागली आहे.मात्र या आर्थिक राजधानीत आरोग्य सेवेची वाणवा आहे.कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उरणमध्येच अद्ययावत रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीनंतर एक जेएनपीटीच्या तर बोकडवीरा येथे १२० तर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केअर पांईट येथे ४० खाटांचे कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
२)मात्र या दोन्ही कोवीड सेंटरमध्ये आवश्यक असलेल्या वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन,नर्स, वार्डबॉय यांच्या नेमणुका केल्या नाहीत.त्यामुळे या कोवीड सेंटरमध्ये फक्त पहिल्या कॅटेगिरीमधील साधा आजार असलेले कोवीडचे रुग्ण उपचारासाठी दाखल केले जात आहेत.तर उर्वरित कॅटेगिरीमधील कोवीडचे रुग्ण पनवेलमध्ये पाठविण्यात येत असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र ईटकरे यांनी दिली.