आगरदांडा/वडखळ/महाड : मुरूड तालुक्यातील मिठेखार येथील एका महिलेचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, वडखळ येथे नऊ वर्षाच्या मुलाला लागण झाली आहे. महाडमधील नर्सलाही लागण झाली.मौजे मिठेखार येथील महिलेला ३० एप्रिलला आकडी आल्याने अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे प्रकृती अधिक खालावल्याने तिला कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात पाठविले. तेथे प्रकृती चिंताजनक झाल्याने जे. जे. रुग्णालयात पाठविले. तेथे १२ मेला तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर स्वॅब चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला.तर, वडखळ येथील ९ वर्षाच्या आजारी असलेल्या या मुलाला दोन-दिवसांपूर्वी वाडिया रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याची स्वॅब चाचणी केली. गुरुवार, १४ मे रोजी पॉझिटिव्ह अहवाल आल्यावर त्याला नायर हॉस्पिटलमध्ये हलविले आहे.महाड ग्रामीण रुग्णालयातील नर्सचा स्वॅब अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर महाड ग्रामीण रुग्णालयातच तिच्यावर उपचार सुरू केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.
coronavirus: मुरूडमध्ये महिलेचा मृत्यू; पेण, महाडमध्ये दोन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 2:14 AM