Coronavirus : विनाकारण फॅशन म्हणूून मास्क घालू नका, बाजारात मिळणाऱ्या मास्कवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 02:54 AM2020-03-21T02:54:12+5:302020-03-21T02:54:28+5:30

कोरोना या घातक विषाणूने जगभरात प्रकोप माजवला आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण गेले आहेत.

Coronavirus: Do not wear masks for any reason, do not question the mask on the market | Coronavirus : विनाकारण फॅशन म्हणूून मास्क घालू नका, बाजारात मिळणाऱ्या मास्कवर प्रश्नचिन्ह

Coronavirus : विनाकारण फॅशन म्हणूून मास्क घालू नका, बाजारात मिळणाऱ्या मास्कवर प्रश्नचिन्ह

Next

अलिबाग  - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. सॅनिटायझरची किंमत दुपटीने वाढली आहे, तर मास्कच्या किमतीही शंभर रुपयांच्या घरात गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा भुर्दंड पडत आहे. मुळात असे कोणतेच मास्क वापरण्याची गरज नसल्याचा निर्वाळा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिला आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांनीच मास्कचा वापर आवश्यक असल्याकडेही लक्ष वेधले.
कोरोना या घातक विषाणूने जगभरात प्रकोप माजवला आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण गेले आहेत. या विषाणूचा फैलाव मानवी संपर्कातून अगदी सहजतने होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याकडून मास्क लावले
जात आहेत. सध्या बाजारात
उपलब्ध असणारे मास्क विकत घेण्याक डे नागरिकांचा मोठ्या संख्येने कल असल्याचे दिसते. मात्र ज्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांनाच एन-९५ हे मास्क लावण्यात येते. तसेच त्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय
यांनीच मास्क वापरणे अधिक गरजेचे आहे.
सध्या बाजारात सॅनिटायझर आणि मास्कचाही तुटवडा जाणवू लागला आहे. काही ठिकाणी तर मास्कच्या किमतीही दुपटीने वाढल्या आहेत. महागडी किंमत मोजून घेतलेले बाजारातील मास्क जास्त दिवस टिकतही नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढल्यास मास्कच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. मात्र हीच संधी हेरून रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये टेलरकडून असे मास्क शिवून ते विकले जात आहेत. मात्र असे मास्क घेणे टाळणे गरजेचे आहे. असे मास्क कोठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये तयार करण्यात आले आहेत म्हणजेच ते हायजीन आहेत का, हेही तपासून पाहणे आवश्यक असल्याकडे डॉ. गवई यांनी लक्ष वेधले.
कपड्याच्या गुणवत्तेवरून आणि लहान-मोठ्या आकारावरून याची किंमत ठरविण्यात आली आहे. २०, २५ आणि ३० रु पयांच्या किमतीत हे मास्क बाजारात विकले जात आहेत. यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

कोरोनापासून वाचायचे असेल तर खबरदारी म्हणून नागरिकांनी लोकांशी थेट संपर्क टाळावा. गर्दी टाळून घरातच राहणे गरजेचे आहे. खोकताना आणि शिंकताना नाका-तोंडावर रुमार धरावा, सातत्याने हात धुवावेत. नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये.
- डॉ. प्रमोद गवई

Web Title: Coronavirus: Do not wear masks for any reason, do not question the mask on the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.