देवासारखा डॉक्टर! ५०० कुटुंबांना औषधांचं मोफत वाटप; अडकलेल्या ३०० जणांना घरी पोहोचवण्याची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 09:20 PM2020-06-01T21:20:10+5:302020-06-01T21:26:16+5:30

उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येकाला मोफत सॅनिटायझर आणि मास्क

coronavirus doctor in alibag distributes Arsenicum album to 500 families kkg | देवासारखा डॉक्टर! ५०० कुटुंबांना औषधांचं मोफत वाटप; अडकलेल्या ३०० जणांना घरी पोहोचवण्याची सोय

देवासारखा डॉक्टर! ५०० कुटुंबांना औषधांचं मोफत वाटप; अडकलेल्या ३०० जणांना घरी पोहोचवण्याची सोय

Next

अलिबाग: राज्यातील कोरोना संकटाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. या संकट काळात अलिबागच्या नागावमध्ये राहणारे मकरंद अरविंद अनेकांना मोलाची मदत करत आहेत. आयुष मंत्रालयानं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणं हा उत्तम उपाय असल्याचं त्यांनी समजून घेतलं. त्यानंतर त्यांनी ५०० हून जास्त कुटुंबांना आर्सेनिकम अल्बम गोळ्यांचं मोफत वाटप केलं. 

मकरंद क्लिनिक या आपल्या खासगी दवाखान्याच्या माध्यमातून ते दररोज रुग्णांना तपासतात, त्यांना औषधं देतात. दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येकाला ते मोफत मास्क आणि सॅनिटायझरदेखील देतात. देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन शिथिल केल्यानं अडकून पडलेल्या अनेकांना घरी जायचं आहे. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. अशा ३०० जणांसाठी मकरंद यांनी बसेसची व्यवस्था करून त्यांना स्वगृही पाठवलं. याशिवाय ते काही जणांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचादेखील पुरवठा करतात.
 

Web Title: coronavirus doctor in alibag distributes Arsenicum album to 500 families kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.