coronavirus: रायगडवरील दुहेरी संकटाने जिल्हा प्रशासनाची दमछाक, कोरोनाच्या व्यवस्थापनाबरोबरच पाणीप्रश्नाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 12:47 AM2020-05-14T00:47:19+5:302020-05-14T00:47:40+5:30

तलाव, विहीरी, बोअरवेल यांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे.

coronavirus: Double crisis on Raigad has left the district administration in a dilemma. | coronavirus: रायगडवरील दुहेरी संकटाने जिल्हा प्रशासनाची दमछाक, कोरोनाच्या व्यवस्थापनाबरोबरच पाणीप्रश्नाकडे लक्ष

coronavirus: रायगडवरील दुहेरी संकटाने जिल्हा प्रशासनाची दमछाक, कोरोनाच्या व्यवस्थापनाबरोबरच पाणीप्रश्नाकडे लक्ष

Next

- आविष्कार देसाई
अलिबाग : कोरोना विषाणुचा मुकाबला करताना प्रशासनाची सर्व शक्ती कोरोनासाठी खर्च होत आहे. त्यामुळे नियमीत आणि दैनंदीन कामांचे व्यवस्थापन करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने पाणीटंचाईचा प्रश्न हाताळताना प्रशासनाला काळजी घ्यावी लागत आहे. कडक उन्हाच्या झळा वाढत असतानाच पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे होत आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल २९२ गाव-वाड्यांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. ५१ हजार ७६३ नागरिकांना ३१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रखर उन्हाचा तडाखा वाढ आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनच्या कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी नागकिरांना संघर्ष करावा लागत आहे. जिह्यात मोठ्या संख्येने पाऊस पडून देखील योग्य नियोजना अभावी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.
s
तलाव, विहीरी, बोअरवेल यांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे. पेण तालुक्याला याची अधिक झळ बसली आहे. येथील ११ गावे आणि ८२ वाड्या अशा एकूण ९३ ठिकाणच्या २२ हजार २५० नागरिकांना सात खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरोनाच्या कालावधीत पाणीटंचाईवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कोणत्याच ठिकाणी पाण्याची टंचाई भासणार नाही, असे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

१५ तालुक्यांपैकी ज्या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती आहे, अशा गाव, वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

२९२ गावांना टँकरने पाणी : उरण तालुक्यातील ५ वाड्यांमधील ९९८ नागरिकांना दोन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील ५ गावे, ५ वाड्या एकूण १० गाव/वाड्यांमधील ४ हजार ८०५ नागरिकांना दोन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कर्जतमधील ३ गावे, १० वाड्या एकूण १३ गाव/वाड्यांमधील एक हजार ५६० नागरिकांना दोन खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खालापूरमधील १ गाव, ४ वाड्या अशा ५ गाव/वाड्यांमधील १ हजार ५५० नागरिकांना एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सुधागड तालुक्यातील २ गावे, ४ वाड्या अशा ६ गाव/वाड्यांमधील १ हजार ४०५ नागरिकांना एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील ४ गावे, २ वाड्या अशा ६ गाव/वाड्यांमधील एकूण २ हजार ८९६ नागरिकांना सामाजिक संस्थेच्या मदतीने एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महाडमधील ७ गावे, ५५ वाड्या अशा ६२ गाव/वाड्यांमधील एकूण २ हजार ३६५ नागरिकांना ५ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पोलादपूरमधील ३० गावे, ५७ वाड्या अशा ८७ गाव/वाड्यांमधील एकूण ११ हजार २३० नागरिकांना ६ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. श्रीवर्धनमधील एका गावातील ३४८ नागरिकांना एका खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुरुडमधील एका गावातील ७४० नागरिकांना एका खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर तळा तालुक्यातील १ गाव, २ वाड्या, ३ गाव/वाड्यांमधील एकूण १ हजार ६१६ नागरिकांना दोन खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरुड आणि तळा या बारा तालुक्यांमधील एकूण ६६ गावे, २२६ वाड्या अशा मिळून एकूण २९२ गाव/वाड्यांमधील एकूण ५१ हजार ७६३ नागरिकांना ३० खासगी, सामाजिक संस्थेच्या मदतीने एक अशा ३१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे,
- सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.), रायगड
 

Web Title: coronavirus: Double crisis on Raigad has left the district administration in a dilemma.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.