अलिबाग : कोरोनाचा कहर अद्यापही रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वाढत आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उद्योग-व्यवसायातील काही घटकांना राज्य सरकारने सुधारीत नियमानुसार परवानगी दिली आहे. परंतु कोरोनाच्या दहशतीमुळे आणि सुधारीत नियमांबाबत असलेल्या अज्ञानामुळे नागरिक घराबाहेर पडल्याचे दिसून आले नाही. पुढील कालावधीत या घटकांचे व्यवहार सुरळीत सुरु होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.शेतीच्या मशागतीची कामे सुरु होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र शेतीला आवश्यक असणारे बियाणे, अवजारे यांची दुकाने पूर्णत: सुरु झाल्याचे दिसले नाही. सुधारीत नियमांबाबत अद्यापही रायगडच्या ग्रामिण भागातील नागरिकांना माहितीच नसल्याने ते घरीच होते. सरकारी कार्यालयामध्ये १० टक्के कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आल्याने सरकारी यंत्रणांच्या विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात वर्दळ दिसत होती. सुतार काम करणाºयांनाही सुट देण्यात आलेली असली तरी, त्यांना आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्याची हार्डवेअरची दुकाने बंद असल्याने त्यांचीही निराशा झाली.४९ नागरिकांना बाधाराज्यासह रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. रायगडमध्ये १९ एप्रिलपर्यंत ४९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रायगड रायगड जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे.
CoronaVirus: सुधारित नियमांच्या अज्ञानाने नागरिक घरातच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 2:11 AM