शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रूग्णवाहिकेमुळे वाचले आजीबाईंचे प्राण; सामाजिक संस्थेची मदतीनं वेळीच उपचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 1:04 AM

लॉकडाउनच्या काळात शेलू येथील सुनंदा अनंत शेलार या ७० वर्षीय आजीला तीन ते चार दिवस सतत ताप येत होता; परंंतु घरी उपचार होत नव्हते.

कांता हाबळेनेरळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाउनच्या काळात अनेक ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत, तर काही ठिकाणी रुग्वाहिका नाहीत. अशा परिस्थितीत शेलू येथील भोले बाळाजी फाउंडेशनची रुग्णवाहिका २४ तास सेवेत रुजू आहे. या रुग्णवाहिकेमुळेच शेलू येथील एका ७० वर्षीय आजीला वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहे.

तालुक्यातील भोले बालाजी फांउडेशने लॉकडॉउनच्या काळात अनेक गोरगरीब जनतेला आधार देण्याचे काम केले आहे. भोले बालाजी फांउडेशनचे अध्यक्ष नीलेश कोळेकर यांच्या माध्यमातून जीवनाश्यक वस्तूंचे वाटपदेखील करण्यात आले आहे. तसेच त्यांची रुग्णवाहिका ही गेल्या चार वर्षांपासून गोरगरिबांच्या सेवेसाठी उभी आहे.

लॉकडाउनच्या काळात शेलू येथील सुनंदा अनंत शेलार या ७० वर्षीय आजीला तीन ते चार दिवस सतत ताप येत होता; परंंतु घरी उपचार होत नव्हते. भोले बालाजी फाउंडेशने आणि रुग्णवाहिकेचे वाहक मनोहर कदम यांनी तत्काळ नेरळ येथे उपचारासाठी नेले.तेथील डॉक्टरने आजीला जास्त ताप असल्याने कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर आजीला कर्जत येथे नेल्यानंतर योग्य उपचार करण्यात आले.

वेळेत उपचार मिळाल्याने आजीचे प्राण वाचले आहेत. अशा लॉकडाउनच्या काळात सुमारे ८० रुग्णांच्या सेवेसाठी ही रुग्णवाहिका धावून आली आणि त्यांना वेळेत उपचार मिळून देण्याचे काम भोले बालाजी परिवाराने केले आहे. त्यामुळे असे विनामूल्य सेवा देणाऱ्या भोले बाळाजी फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.