coronavirus: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; रायगड जिल्ह्यातील इमारती प्रशासनाकडून अधिग्रहित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 01:26 AM2020-05-13T01:26:56+5:302020-05-13T01:28:34+5:30

कोरोनाविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कोरोना रुग्णांमध्ये असणाऱ्या सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणानुसार वर्गवारी करून संबंधित रुग्णांवर तत्काळ उपचार करणे गरजेचे आहे.

coronavirus: increased prevalence of coronavirus; Buildings in Raigad district acquired from the administration | coronavirus: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; रायगड जिल्ह्यातील इमारती प्रशासनाकडून अधिग्रहित

coronavirus: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; रायगड जिल्ह्यातील इमारती प्रशासनाकडून अधिग्रहित

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील सरकारी इमारती अधिग्रहित केल्या आहेत.

कोरोनाविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कोरोना रुग्णांमध्ये असणाऱ्या सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणानुसार वर्गवारी करून संबंधित रुग्णांवर तत्काळ उपचार करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालये, सरकारी, निमसरकारी इमारती अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत.

सिडको शाळा इमारत करंजाडे, सिडको आॅफिस सेक्टर-१९ उलवे, आदिवासी विभाग, मुलांचे वसतिगृह पनवेल, खांदा वसाहत, जुने पनवेल, जिल्हा परिषद शाळा करंजाडे, या इमारती कोरोना केअर सेंटर यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. उरणमधील जेएनपीटी रुग्णालयाची इमारत कोरोना आरोग्य केंद्राकरिता अधिग्रहित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पनवेलचे उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम हॉस्पिटल (कामोठे) या इमारतीही कोरोना आरोग्य केंद्रासाठी अधिग्रहित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title: coronavirus: increased prevalence of coronavirus; Buildings in Raigad district acquired from the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.