अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील सरकारी इमारती अधिग्रहित केल्या आहेत.कोरोनाविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कोरोना रुग्णांमध्ये असणाऱ्या सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणानुसार वर्गवारी करून संबंधित रुग्णांवर तत्काळ उपचार करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालये, सरकारी, निमसरकारी इमारती अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत.सिडको शाळा इमारत करंजाडे, सिडको आॅफिस सेक्टर-१९ उलवे, आदिवासी विभाग, मुलांचे वसतिगृह पनवेल, खांदा वसाहत, जुने पनवेल, जिल्हा परिषद शाळा करंजाडे, या इमारती कोरोना केअर सेंटर यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. उरणमधील जेएनपीटी रुग्णालयाची इमारत कोरोना आरोग्य केंद्राकरिता अधिग्रहित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पनवेलचे उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम हॉस्पिटल (कामोठे) या इमारतीही कोरोना आरोग्य केंद्रासाठी अधिग्रहित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
coronavirus: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; रायगड जिल्ह्यातील इमारती प्रशासनाकडून अधिग्रहित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 1:26 AM