शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

Coronavirus: कोविड हा सर्वव्यापक परमेश्वराप्रमाणे, तो चराचरात आहे; सत्य जाणून घ्या. यातच सर्वांचं कल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 1:27 AM

हे काम करीत असताना एकदा मला ताप आला. हा ताप आठ  दिवस टिकला. छातीचा सीटीस्कॅन केला, त्यात कोविड न्यूमोनियाचे निदान झाले. एवढा कोविड रुग्णांशी संपर्क आल्याने मला कोविड झाल्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही.

खरे तर मी अस्थिरोगतज्ज्ञ, म्हणजे माझा तसा कोविड आजाराच्या उपचाराशी फारसा संबंध नाही. पण कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात गैरसमजांमुळे कोविड केअरमध्ये काम करायला कोणीच तयार नव्हते. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नेहुलीला एकदा बोलता बोलता हा प्रश्न माझ्यासमोर मांडला. मी म्हटले मी काम करायला तयार आहे.

सरकारी दवाखान्यात मार्च २०२०नंतर अस्थिरोगतज्ज्ञ नसल्यामुळे मी तिथे ऑपरेशन्स करायला सुरू केली होती. त्यामुळे कोविडशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्क रोजचाच होता. त्यामुळे कोविड केअर हे त्याचेच एक्टेन्शन असे समजून मी नेहुली (अलिबाग) येथे कोविड केअर सेंटरमध्ये पुढाकार घेऊन अनेकांना काम करायला प्रवृत्त केले  बाकी कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्याने दोन चांगल्या गोष्टी झाल्या. एक म्हणजे कोविडची बाधा झालेल्या व्यक्तींना जवळून पाहता आले त्यांच्यावर उपचार करताना, त्यांना धीर देताना त्यांच्या शारीरिक, मानसिक स्थितीचा डॉक्टर म्हणून अभ्यास करता आला आणि दुसरी म्हणजे ॲडमिट केलेले, उपचार केलेले सर्व रुग्ण बरे होताहेत हे पाहून कोविडबद्दलची भीती निघून गेली. सर्व रुग्णांना मी जवळून, हात लावून तपासत असे, त्याच्या प्रश्नांना, शंकांना मी त्यांचे समाधान होईपर्यंत उत्तरे देत असे – त्या सुरुवातीच्या काळात कोव्हिड रुग्णांबाबत समाजबहिष्कृतीची भावना फार प्रबळ होती. त्यामुळे त्यांनाही (रुग्णांनाही) याबद्दल कौतुक वाटे. कोरोनाकाळात अनेकजण विविध कारणे सांगून काम करण्यास टाळाटाळ करत असताना मी स्वतःहून-कोरोना हा माझ्या विषयाशी संबंधित आजार नसतानादेखील–कोरोना रुग्णांकरिता काम केले व इतरांना कोरोनारुग्णांकरिता काम करण्यास उद्युक्त केले याची जाणीव ठेवून शासनाने (जिल्हा प्रशासनाने) माझा  १५ ऑगस्टला रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कारही केला.

हे काम करीत असताना एकदा मला ताप आला. हा ताप आठ  दिवस टिकला. छातीचा सीटीस्कॅन केला, त्यात कोविड न्यूमोनियाचे निदान झाले. एवढा कोविड रुग्णांशी संपर्क आल्याने मला कोविड झाल्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. त्रास खूप झाला, पण मी कोणतेही विषाणूरोधक औषध घेतले नाही आठ दिवसांनंतर ताप गेला आणि साधारण १२ दिवसांनंतर हळूहळू अशक्तपणा कमी होऊ लागला, अन्न पोटात जाऊ लागले. मी श्वासाचे आणि इतर नियमित व्यायामही सुरू केले आणि यथावकाश कामही सुरू केले. कोरोनाबद्दलच्या आतापर्यंतच्या अनुभवावरून कोरोनाने मला काय शिकवले या प्रश्नाचे उत्तर मी प्रवचनकाराच्या भूमिकेतून देतो.

कोविड हा सर्वव्यापक परमेश्वराप्रमाणे आहे. तो चराचरात आहे. तुम्ही त्यापासून दूर पळण्याचा व्यर्थ प्रयत्न करत आहात....हे सत्य जाणून घ्या. यातच आपले सर्वांचे कल्याण आहे.....तो काही दिवसांनी जाणार आहे.  बहुतेकांना तो थोडा गुदगुल्या करून जाईल, काहींना तो बडवेल, तर फार थोड्या लोकांना  खरे सांगायचे तर याबाबत आपल्या हातात करण्यासारखे फारसे काही नाही. तेव्हा चिंता सोडा आणि कामाला लागा. 

 कोविडबाबत अनेकांना चिंता वाटते, काही लोकांच्या कपाळावरील आठ्या तशाच राहतात. मी विचार करतो, कदाचित त्यांनाहे वास्तव उद्या समजेल. परवा उमगेल. - डॉ. चंद्रशेखर साठ्ये

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या